धुळे: गुड्ड्याच्या खूनप्रकरणी संगमनेरच्या लखन जेधेला पोलिस कोठडी

हरिभाऊ दिघे
शनिवार, 29 जुलै 2017

धुळे येथील कुख्यात गुंड रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्डया याची दि. १८ जुलै रोजी सकाळी तलवार आणि धारदार शस्त्राचा वापर करून निर्घृण खुन करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपासासाठी संगमनेर शहरात आले होते.

तळेगाव दिघे (जि. नगर) : धुळे येथील गुडडयाच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना मदत करणाऱ्या संगमनेर येथील लखन दीपक जेधे यास धुळे पोलिसांनी अटक केली. त्यास धुळे न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

धुळे येथील कुख्यात गुंड रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्डया याची दि. १८ जुलै रोजी सकाळी तलवार आणि धारदार शस्त्राचा वापर करून निर्घृण खुन करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपासासाठी संगमनेर शहरात आले होते. त्यांनी लखन जेधे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

गुडडयाच्या खुनानंतर आरोपींना संगमनेरात आश्रय देत त्यांना मदत केल्याचे चौकशीत उघड झाल्याने लखन जेधे यास धुळे पोलिसांनी अटक केली. आरोपी जेधे यास धुळे न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि. ४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खून प्रकरणात लखन जेधे याच्या अटकेने संगमनेर धुळे पोलीसांच्या रडारवर आले आहे. जेधे याने आरोपींना काय मदत केली याचा पोलीस शोध घेत आहे.

Web Title: Dhule news guddya murder case one arrested