अवयवदानबाबत भाजप वैद्यकिय आघाडीतर्फे जनजागृती

एल. बी. चौधरी
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

डाॅ. श्रीराम भतवाल यांनी मानवी साखळी करुन अवयवदानाची शपथ देऊन अवयवदान हे मॄत्युनंतरही समाज ॠण फेडणारे, पुण्य व महान कार्य आहे. डाॅक्टरांनी अवयवदाना बाबत पुढाकार घेतल्यामुळे लोकांमध्ये जनजागॄती होऊन अवयवदान ही लवकरच लोकचळवळ होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

सोनगीर (जि. धुळे) : येथील ग्रामीण रुग्णालयात भाजपा वैद्यकिय आघाडी धुळे जिल्हा व धुळे महानगर यांच्यावतीने अवयवदाना बाबत जनजागॄती करण्यासाठी रॅली, अवयवदान शपथ, मानवी साखळी, चर्चासत्र  घेण्यात आले. अवयवदान जागृती या शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चिकाटीने काम करण्याचे ठरले.

अध्यक्षस्थानी भाजपा वैद्यकिय आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डाॅ. श्रीराम भतवाल होते. भाजपा वैद्यकिय आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. योगेश ठाकरे, महानगर सरचिटणीस डाॅ. समीर शिंदे, जिल्हा सरचिटणीस डाॅ. अजय सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.  योगेश शालीग्राम पाटील, महानगर जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.चेतन पाटील, महानगर जिल्हा सरचिटणीस डाॅ. सिद्धार्थ पाटील, धुळे तालुकाध्यक्ष डाॅ. युवराज नवटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. एस. ए. बौर्डे, डाॅ.निकवाडे आदि व्यासपीठावर उपस्थित  होते. 

डाॅ. श्रीराम भतवाल यांनी मानवी साखळी करुन अवयवदानाची शपथ देऊन अवयवदान हे मॄत्युनंतरही समाज ॠण फेडणारे, पुण्य व महान कार्य आहे. डाॅक्टरांनी अवयवदाना बाबत पुढाकार घेतल्यामुळे लोकांमध्ये जनजागॄती होऊन अवयवदान ही लवकरच लोकचळवळ होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

प्रस्तावना डाॅ. योगेश ठाकरे, तर अवयवदानाचे महत्व डाॅ योगेश पाटील यांनी सांगीतले. डाॅ सौ बोर्डे यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन डाॅ अजय सोनवणे यांनी केले. व आभार मानले. डाॅ कल्पक देशमुख, डाॅ नरेंद्र पाटील, डाॅ नयन सुर्यवंशी, डाॅ गौरव पारेख, डाॅ किरणकुमार  थोरात, डाॅ कलीम शेख, डाॅ प्रमोद पाटील, डाॅ जगदिश चौधरी, राहुल देशमुख, स्वप्निल जैन, कपिल जमल, भाजपाचे ज्ञानेश्वर चौधरी, आर के माळी, साहेबराव बिरारी, राजेंद्र जाधव, राजु पाडवी, नितिन जैन आदी उपस्थित पहोते.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व रुग्ण होते. अवयवदान जनजागॄती रॅली काढुन कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Dhule news health campaign in songir