जैताणेत 'अंनिस'तर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 2 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेतर्फे गुरुवारी (ता.1) सायंकाळी सातच्या सुमारास जैताणे (ता. साक्री) ग्रामपंचायत चौकात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. त्यातून व्यसनमुक्तीसह पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. गावातील केरकचरा, प्लास्टिकमुक्तीसह विडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, दारू आदी व्यसनांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. शाखाध्यक्ष डॉ. हेमंत पाटील यांनी पर्यावरणपूरक होळीचे दहन केले.

यावेळी शाखेचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश गवळे, कार्याध्यक्ष मनोज भागवत, प्रधान सचिव रामचंद्र भलकारे, निधी संकलक किशोर बागुल, प्रसिद्धिप्रमुख रवींद्र जाधव, प्रकाशन कार्यवाह अमोल जाधव, सांस्कृतिक कार्यवाह सतीश बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते तुषार खैरनार, गोकुळ देवरे, पंकज सोनवणे, रवींद्र देवरे, अनिल बागुल, गोकुळ माळी, अनुराग जगदाळे, श्री. चिंचोले आदी उपस्थित होते. यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक होळीच्या विविध घोषणा दिल्या.

Web Title: dhule news jaitane holi superstition Nirmulan Samiti