दोन वर्षांपासून 45 कोटींचा निधी पडून! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

धुळे - धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील तापी नदीकाठावरील 22 उपसा जलसिंचन योजनांसाठी सत्ताधारी भाजपने 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु, या योजनेच्या कामांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने दोन वर्षे उलटूनही निधी तसाच पडून आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश दिला जावा, अशी सूचना त्यांनी केली. 

मंत्री रावल यांनी दोन दिवसांपूर्वी नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 22 उपसा जलसिंचन योजनांच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली. नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक संजय पाटील, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता जोशी यांच्यासह सिंचन विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मंत्र्यांची नाराजी 
मंत्री रावल यांनी शासनाकडे पाठपुरावा करून किरकोळ दुरूस्तीअभावी बंद 22 उपसा जलसिंचन योजनांसाठी निधी मंजूर करून आणला. त्याला दोन वर्षे झाली तरी अद्याप काम सुरू झाले नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. निविदा प्रकिया राबविताना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकच निविदा काढणे अपेक्षित होते. परंतु, वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये निविदा काढली जात असल्याने कंत्राटदार ही कामे करण्यास इच्छुक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता स्थापत्य, अभियांत्रिकी, इलेक्‍ट्रिकल, अशा तीन विभागांनी स्वतंत्र निविदा काढली असून, पैकी दहा योजनांसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. सहा योजनांसाठी प्रस्तावित फाइल मंत्रालयात असून, त्यावर लवकर निविदा प्रक्रिया राबवून डिसेंबरपर्यंत सर्व कार्यादेश दिले जावेत, अशी सूचना मंत्री रावल यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. प्रसंगी मंत्रालयात जर फाइल अडली असेल तर त्यासाठी सहकार्य करीन. लवकर कामे मार्गी लागावी, असे सांगत मंत्री रावल यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 

Web Title: dhule news Jaykumar Rawal