जैताणे-निजामपूर येथील बौद्ध बांधवांकडून पोलिसांना निवेदन

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 3 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ जैताणे-निजामपूर येथील समस्त बौद्ध समाजबांधव, भीमसैनिक व भीमगर्जना ग्रुपतर्फे आज (बुधवार) निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

"विजय स्तंभ, कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी (ता. 1) लाखो भीम अनुयायी मानवंदना देण्यासाठी जमले असता, तेथे समाज कंटकांनी पूर्वनियोजित कट रचून भिमानुयायांवर, स्त्रिया व बालकांवर हल्ला केला, वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली. त्या संबंधित गुन्हेगारांना त्वरित अटक करून, कठोर शिक्षा करावी," असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र जाधव, राहुल महिरे, नामदेव पिंपळे, सिद्धार्थ जाधव, रवींद्र जगदेव, धर्मा जगदेव, रतन बच्छाव, सुनील जाधव, विनोद जाधव, सुभाष जाधव, कैलास जाधव, रोहित जाधव, आनंद पिंपळे, शशिकांत पिंपळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: dhule news koregaon bhima and nijampur jaitane people letter to police