धुळे शहरात हिंसक वळण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

धुळे - कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीतर्फे बुधवारी पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण लागले. धुळे शहरात आग्रा रस्ता, साक्री रस्ता परिसरात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. शिरपूर आगारात उभ्या असलेल्या बसवर बाहेरून मोटारसायकलने आलेल्या तरुणांच्या टोळक्‍याने पिशवीतून आणलेल्या दगडांचा मारा केला. यात तीन बसचे नुकसान झाले. दगडफेकीत शिरपूर-शहादा बसचा चालक जखमी झाला. समितीतर्फे पाचकंदील येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री, देवभाने फाटा, म्हसदीसह काही ठिकाणी शांततेत निदर्शने, "रास्ता रोको' करण्यात आला.

धुळे - कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीतर्फे बुधवारी पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण लागले. धुळे शहरात आग्रा रस्ता, साक्री रस्ता परिसरात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. शिरपूर आगारात उभ्या असलेल्या बसवर बाहेरून मोटारसायकलने आलेल्या तरुणांच्या टोळक्‍याने पिशवीतून आणलेल्या दगडांचा मारा केला. यात तीन बसचे नुकसान झाले. दगडफेकीत शिरपूर-शहादा बसचा चालक जखमी झाला. समितीतर्फे पाचकंदील येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री, देवभाने फाटा, म्हसदीसह काही ठिकाणी शांततेत निदर्शने, "रास्ता रोको' करण्यात आला. पोलिसांनी जादा कुमक तैनात केली होती. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात येत होते. परिवहन महामंडळाने एसटी वाहतूक सकाळी 11 पासून बंद केली होती. 

बंदचे परिणाम... 
- धुळे शहरात तणावपूर्ण वातावरण 
- शाळांमध्ये शुकशुकाट 
- साक्री येथे शांततेत मोर्चा 
- कापडणे येथे "रास्ता रोको' 

Web Title: Dhule news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash