निजामपूरला जिल्हास्तरीय गरबा नृत्य स्पर्धा...

निजामपूरला जिल्हास्तरीय गरबा नृत्य स्पर्धा...
निजामपूरला जिल्हास्तरीय गरबा नृत्य स्पर्धा...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता. साक्री) येथील भामेर रोडवरील म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट व नवरात्र उत्सव समितीतर्फे नवरात्रीनिमित्त म्हसाई माता मंदिर परिसरात जिल्हास्तरीय गरबा, रास नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण नऊ संघ सहभागी झाले असून, दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान ही स्पर्धा घेतली जात आहे. 21 सप्टेंबरला स्पर्धेचे उदघाटन झाले असून, 29 सप्टेंबरला अंतिम फेरी घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी किमान 10 सदस्यांचा संघ असेल तर प्रत्येक सहभागी संघाला सादरीकरणासाठी दहा मिनिटे वेळ दिला जाणार आहे.

सहभागी संघांमध्ये निजामपूर येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलचा संघ, इंदिरा गांधी माध्यमिक शाळेचा संघ, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचा संघ, शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचे दोन संघ, पिंपळनेरच्या सियान इंटरनॅशनल स्कुलचा संघ, कुमारनगर-धुळे येथील साथीया ग्रुपचा संघ, तिसा (ता. धडगाव) येथील दशामाता गरबा मंडळ व असलीपाडा (खांडबारा) येथील आदिवासी देवमोगरा गरबा मंडळ आदी नऊ संघांचा समावेश आहे. शेखर अहिरे व रत्नप्रभा वाघ (साक्री) हे स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. स्पर्धेसाठी पाचशे रुपये प्रवेश शुल्क असून विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यात निजामपूर येथील कै. बंडू आत्माराम वाणी यांचे स्मरणार्थ एकनाथ बंडू वाणी यांचेकडून अकरा हजारांचे व कै. रामदास बापू वाणी यांचे स्मरणार्थ उदय अमृतकर यांचेकडून पाच हजारांचे असे एकूण सोळा हजारांचे रोख प्रथम पारितोषिक, श्री. डी. एन. पाटील (जैताणे) यांचेकडून रोख अकरा हजारांचे द्वितीय पारितोषिक तर कै. नथीबाई सीताराम जयस्वाल यांचे स्मरणार्थ रुपाली ग्रुप (जैताणे) यांच्याकडून सात हजार शंभर रुपयांचे रोख तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे.

संपूर्ण मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला असून साक्री-नंदुरबार रोडवरील भामेर शिवारातील या म्हसाई माता मंदिर परिसरात देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातून भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. दरवर्षी नवरात्रीचे नऊ दिवस याठिकाणी यात्रा भरते. लहान मुलांसाठी बालोद्यानही आहे. खेळणी, पाळणा, हॉटेल व्यावसायिक आदींसह विविध विक्रेते दाखल झाले असून वाहन पार्किंगसह चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. याठिकाणी तहसीलदार संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर आदींसह मान्यवर व लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, उपाध्यक्ष भिकनलाल जयस्वाल आदींसह नवरात्र उत्सव-समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक मंडळ, नवरात्र उत्सव-समितीचे सर्व सदस्य, म्हसाई माता महिला पतसंस्थेचे संचालिका मंडळ व कर्मचारी, निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलीत श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व श्रीमती आशुमतीबेन शाह विद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य मदन शिंदे, मुख्याध्यापक मनोज भागवत आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीही परिश्रम घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com