पेट्रोल पंपावरील सशस्त्र दरोड्यात एकाची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल पंपावरील 10 ते 15 हजारांची रोकड लांबवल्याचेही सूत्रांनी सांगितले.

धुळे : पेट्रोल पंपावरील सशस्त्र दरोड्यात एकाची निर्घुण हत्या तर, दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी १५ हजारांची रोकड लांबवली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. 

पारोळा रोडवर धुळे शहरालगत असलेल्या कोयल पेट्रोल पंपावर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी पेट्रोल पंपावर झोपलेल्या एका वृद्ध रोलर मशीन ड्रायव्हरची निर्घृण हत्या झाली असून, दरोडेखोरांच्या हल्ल्यात पेट्रोल पंपाचे 2 कर्मचारीही गंभीरपणे जखमी झाले आहेत.

दरम्यान यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल पंपावरील 10 ते 15 हजारांची रोकड लांबवल्याचेही सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक हिंमत जाधव, निलेश सोनवणे, एलसीबीचे निरीक्षक रमेश परदेशी, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेची माहिती घेऊन हल्लेखोरांचा शोध घेता आहेत.

Web Title: dhule news one killed petrol pump robbery