धुळे : प्रणामी पंथातर्फे भिक्षा मागण्याचा कार्यक्रम

एल. बी. चौधरी 
रविवार, 6 ऑगस्ट 2017

श्रीकृष्ण प्रणामी धर्माचे संस्थापक सत्गुरु धनी देवचंद्रजी महाराज  व त्यांचे शिष्य स्वामी प्राणनाथजी महाराज जीवनचरित्रावर आधारित ही बीतक कथा आहे. प्रणामी पंथाचे थोर संत प्राणनाथजी महाराज गोर - गरीब व विविध समस्यांनी पिडीत जनतेला कल्याणाचा मार्ग सांगत मंदसोर ( म. प्र. ) येथे पोहचले. तेथे त्यांचा सत्कार करताना धनाढ्यांनी मोठे नजराणे भेट दिले.

सोनगीर (जि. धुळे) : श्रीकृष्ण प्रणामी पंथाच्या अनुयायींनी गावात भिक्षा मागून संपत्तीचा गर्व करू नका असा संदेश दिला. मिळालेल्या भिक्षा एकत्र करून भोजनाचा आस्वाद घेतला. परमेश्वराच्या लेखी धनवान व भिकारी यांच्यात काहीच फरक नाही असा संदेश यातून देण्यात आला. 

येथील कासार गल्लीतील श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात गेल्या 14 तारखेपासून श्रीमद् बीतक कथा सुरु आहे ही कथा श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यत सुरू राहिल. बीतक कथेचे निरूपण प्राणनाथ ज्ञान केंद्र मुबई येथील विदुषी रचिता सखी प्रणामी हे करीत आहे.
या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कथेचा एक भाग म्हणून श्रीकृष्ण प्रणामी धर्मातील महिला पुरुष व बालकानीं गावातून भिक्षा मागुन प्रसाद वाटप केला.

श्रीकृष्ण प्रणामी धर्माचे संस्थापक सत्गुरु धनी देवचंद्रजी महाराज  व त्यांचे शिष्य स्वामी प्राणनाथजी महाराज जीवनचरित्रावर आधारित ही बीतक कथा आहे. प्रणामी पंथाचे थोर संत प्राणनाथजी महाराज गोर - गरीब व विविध समस्यांनी पिडीत जनतेला कल्याणाचा मार्ग सांगत मंदसोर ( म. प्र. ) येथे पोहचले. तेथे त्यांचा सत्कार करताना धनाढ्यांनी मोठे नजराणे भेट दिले. त्यामुळे गरीब शिष्य ओशाळले. प्राणनाथजी महाराजांनी नजराणेंचा स्विकार न करता  गरीब व धनाढ्य भक्तांना घरोघरी भिक्षा  मागण्यासाठी आपल्या सोबत नेले. श्रीमंतीचा अहंकार दूर व्हावा म्हणून भिक्षा मागण्यात आली. विशेष म्हणजे महागडे वेष काढून फकीर वेषातच  भिक्षा मागण्यात आली. याघटनेचे प्रतीक म्हणून दरवर्षी बीतक कथेत हा प्रसंग ज्या दिवशी वर्णन केला जातो त्यादिवशी भिक्षा मागण्याचा कार्यक्रम होतो.

साधुपुरुष सर्वदा परमात्मा कृपेवर निर्भर असतो. म्हणूनच परमात्मा दयेने जे काही भिक्षेच्या रुपात मिळेल त्यावर सगळे फकीर आपली उपजीविका भागवतात. आजही मिळालेल्या भिक्षेची झोळी स्वामींच्या समोर ठेवत सर्वांनी  प्रेमाने खाल्ली. यावेळी  स्वामी प्राणनाथ जी महाराज  व बाईजुराज महाराणी यांची वेशभूषा करण्यात आली होती. त्यांच्या सोबत फकीर बनलेले बालक होते. कथाकार विदुषी रचिता सखी प्रणामी, तपोभूमी धामचे पुजारी संत श्रीपालजी महाराज, पुजारी जगदीश कासार, उपसरपंच  धनंजय कासार, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष अमृतराव कासार, श्रीकृष्ण प्रणामी मंदिर ट्रस्ट चे सचिव अनिल कासार, उपाध्यक्ष राजेद्र तांबट, खजिनदार उदय कासार,  विशवस्त शामकांत कासार, गोविंद कासार, सुरेश कासार, शाम कासार, अविनाश कासार, तपोभूमी धामचे उपाध्यक्ष एस वाय कासार, रमेश कासार, सुनील कासार, अशोक कासार, जी के तांबट वसंतराव कासार, सुरेश कासार आदी उपस्थित होते.

Web Title: Dhule news Pranami community in Songir