दोनशे किल्ल्यावर निवास व्यवस्थेचा प्रस्तावः रावल

दोनशे किल्ल्यावर निवास व्यवस्थेचा प्रस्तावः रावल
दोनशे किल्ल्यावर निवास व्यवस्थेचा प्रस्तावः रावल

धुळेः राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांची महती देश- विदेशातील पर्यटकांना जाणता यावी म्हणून दोनशे किल्ल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाची निवास व्यवस्था साकारण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

पर्यटन विकास महामंडळामार्फत 5 ते 25 ऑक्‍टोबर दरम्यान राज्यात पर्यटन पर्व साजरे केले जात आहे. या कार्यक्रमाचा मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे शुक्रवारी शुभारंभ झाला. मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, "एमटीडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांच्यासह जीव्हीके, जेट एअरवेज, एतिहाद, ओला, कॉक्‍स अँड किंग्ज, कोस्टा क्रुजेस, एअर बी अँड बी आदी प्रवासी तथा पर्यटन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

"एमटीडीसी'तर्फे सवलत
मंत्री रावल म्हणाले, की पर्यटन पर्वात "एमटीडीसी'च्या "रिसॉर्टस्‌'मध्ये पर्यटकांना प्रोत्साहनपर सवलती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच पर्यटन पर्वात राज्यभरात "एमटीडीसी'तर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात निबंध स्पर्धा, "माय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी' ही चित्रपट स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, प्रवासातील अनुभवाबाबत कार्यशाळा, चित्रकला- हस्तकला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

हेरिटेज टुरिजमलाही प्राधान्य
सरकारने पारंपरिक पर्यटनाबरोबरच हेरिटेज टुरिझम, ग्रीन टुरिझम, क्रूझ टुरिझम, माईन टुरिझम, कॅराव्हान टुरिझम, वेलनेस टुरिझम, बॉलिवूड टुरिझम, वाईल्डलाईफ टुरिझम अशा नवनवीन पर्यटन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात पर्यटन क्षेत्रात मोठा वाव आहे. त्यात ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यात देश- विदेशातील पर्यटकांना रस असतो. त्यासाठी हेरिटेज टुरिजमला चालना देण्यासाठी "एमटीडीसी'मार्फत व्यापक प्रयत्न होत असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com