चिनी वस्तू खरेदी करणे बंद करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

धुळे - चिनी उत्पादनासाठी भारत ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. त्यावरच चीनचा आर्थिक डोलारा उभा आहे. तरीही सीमारेषेलगत चीन आगळीक करून भारताला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने चीनमध्ये उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फे मंगळवारी करण्यात आले. शहरातील मनोहर चित्रपटगृहापासून शहरात याबाबतचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली. 

डोकलाममध्ये जिवाची पर्वा न करता 24 तास भारतीय सैनिकांना उभे राहावे लागत आहे. चिनी सैनिक अहंकारीपणाने वागत असल्याने डोकलाम सीमेवर वाद सुरू आहे. आपण मात्र चिनी वस्तू स्वस्त दराने मिळतात म्हणून खरेदी करून चीनची अर्थव्यवस्था बळकट करतो. चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होणारी भारतीय बाजारपेठ आशिया खंडातील एकमेव बाजारपेठ आहे. तिचा वापर आज भारताच्या विरोधात केला जात आहे. भारतीय बाजारपेठेत चीनच्या आर्थिक मुसक्‍या आवळणे ही भारताची आजची गरज आहे. म्हणून आजच जागे व्हा आणि चिनी वस्तूंची खरेदी बंद करा, असे आवाहन फेरीद्वारे करण्यात आले. 

आग्रा रोडने गांधी पुतळ्याजवळ फेरीचा समारोप झाला. निषेध फेरीत जिल्हाप्रमुख हिलाल माळी, लोकसभा संघटक महेश मिस्तरी, महानगरप्रमुख सतीश महाले, डॉ. माधुरी बाफना, भगवान करनकाळ, गंगाधर माळी, संजय गुजराथी, सुनील बैसाणे, ऍड. पंकज गोरे, भूपेंद्र लहामगे, नरेंद्र अहिरे यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. 

Web Title: dhule news shivsena china

टॅग्स