आदर्श विद्या मंदिरात 'गीतगायन' स्पर्धा

​प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 15 जानेवारी 2018

​निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक व नाट्य कलावंत स्व. भय्या उपासनी यांच्या स्मरणार्थ शनिवारी (ता. 13) सहावी ते आठवी व नववी ते बारावीच्या दोन गटात गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापक जयंत भामरे, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी आदींच्या हस्ते प्रतिमापूजनाने स्पर्धेचे उदघाटन झाले.​

​निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक व नाट्य कलावंत स्व. भय्या उपासनी यांच्या स्मरणार्थ शनिवारी (ता. 13) सहावी ते आठवी व नववी ते बारावीच्या दोन गटात गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापक जयंत भामरे, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी आदींच्या हस्ते प्रतिमापूजनाने स्पर्धेचे उदघाटन झाले.​

​स्पर्धेत सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकूण 24 गीते सादर केली. त्यात स्वरचित गीते, लोकगीते, भावगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते, पोवाडा, भारुड आदी गीत प्रकारांचा समावेश होता. सहावी ते आठवीच्या गटात इयत्ता आठवीच्या तुषार जाधवच्या 'शिवरायांचा पोवाड्याला' प्रथम क्रमांक, सातवीच्या महेश झालटेच्या 'खान्देशनी अंबाबाई' ह्या गीताला द्वितीय क्रमांक तर सहावीच्या यश राणे व कृष्णा पाटील यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम मन्हा खान्देसम' ह्या गीताला तृतीय क्रमांक मिळाला. नववी ते बारावीच्या गटात दहावीच्या आशुतोष जगदाळेच्या 'मल्हार मल्हार' ह्या गीताला प्रथम क्रमांक, नववीच्या अनुराग जगदाळेच्या 'सुटाबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर' ह्या भीमगीताला द्वितीय क्रमांक, तर अकरावी विज्ञान शाखेच्या देवयानी बच्छाव हिच्या 'राधा ढुंड रही है' ह्या गीताला तृतीय क्रमांक मिळाला.​

​स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षिका ऊर्मिला मोरे, शिक्षक भिकाजी गावीत, देविदास पाडवी यांनी केले. स्पर्धेला संगीत शिक्षक जयंती कासार, जगदीश पवार, कन्हैयालाल चौरे, शाळेचा माजी विद्यार्थी जगदीश गायकवाड आदींनी संगीतसाथ दिली. शिक्षक सत्यनारायण शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पातील कर्मचारी सत्यनारायण शर्मा यांनीही विद्यार्थ्यांसमोर गीत सादर केले.​ ​कार्यक्रमास संस्थेचे सचिव नितीन शाह, उपमुख्याध्यापक प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. पंडित जाधव आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.​

​स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व त्यांची गीते.​
१.आशुतोष जगदाळे (मल्हार मल्हार)
२.अनुराग जगदाळे (भीमगीत))
३.देवयानी बच्छाव (राधा ढुंड रही है)
४.तुषार जाधव (शिवरायांचा पोवाडा)
५.महेश झालटे (खान्देसनी अंबाबाई)
६.यश राणे, कृष्णा पाटील
(सत्यम शिवम सुंदरम मन्हा खान्देसम)
७.ज्योती बिलाडे (तू गं दुर्गा, तू भवानी)
८.नंदिनी बोरसे (अहिराणी गीत)
९.जतीन पानपाटील (वणी गडले बंगला)
१०.सरला कारंडे, अंजली कारभारी, हर्षदा गवळे (बेटी हूं मैं बेटी)
११.हिरामण तऱ्हाडे(आई तुझ्यामूर्तीवानी)
१२.शुभम कुवर (घाबरलीस का आई)
१३.श्रावणी भामरे (माऊली माऊली)
१४.योगेश बोरसे (आवड मला ज्याची)
१५.जागृती सूर्यवंशी (या पंढरपूराची शान)
१६.माया बच्छाव (वंशाच्या दिव्यापायी)
१७.दीप्ती शेवाळे, दिव्या ओझरकर
(रडू नको कान्हा मी पाण्याला जाते)
१८.पूनम जगदाळे,गौरी जगदाळे (बेटिया)
१९.अक्षय ठाकरे (लगीन देवाचं माझ्या)
२०.यामिनी अहिरे (गवळण चालनी)
२१.रुबल धनगर(जैसी करनी वैसी भरनी)
२२.काजल रत्नपारखी, काजल मोरे, जागृती वाडीले(सांगनादेवीमाझ्याभावाला)
२३.माया मुजगे (राधा ही बावरी)
२४.उमेश सोनवणे(राधे चल माझ्या गावा)

​निजामपूर-जैताणे (ता.साक्री) : येथील आदर्श विद्या मंदिरात स्व. भय्या उपासनी स्मरणार्थ आयोजित गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे गीत सादर करताना आशुतोष जगदाळे व तुषार जाधव आदी​
​(छायाचित्रे : प्रा. भगवान जगदाळे)​

Web Title: dhule news song competition school in nijampur jaitane