राज्यातील धार्मिक स्थळांनी घ्यावेत सामूहिक विवाह सोहळे

दगाजी देवरे
गुरुवार, 22 मार्च 2018

विश्वस्थांना आवाहन.....!
प्रत्येक धार्मिकस्थळांनी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.सर्व विश्वस्थाना सोबत घेत सामूहिक विवाह सोहळ्यासाठी समिती तयार करण्यात येणार आहे.समितीवर सहाय्यक धर्मदाय आयुक्त देखरेख करतील.लवकरच सामूहिक विवाहसोहळ्याचे ठिकाण,वेळ व तारीख जाहीर करण्यात येईल.बैठकीत प्रा.भरत काळे यांनी मागील सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजनाची माहिती दिली.

धुळे : सामान्य,शेतकरी कुटुंबाना विवाह सारखे खर्चिक कार्यक्रम घेणे अवघड होते. यातून कर्जबाजारीपणा व शेतकरी आत्महत्येच्या घटना वारंवार होतात म्हणून शासनाने गरीब घटकातील मुलींचे सामूहिक विवाहासाठी धार्मिक स्थळांचा सहभाग असावा असे ठरवले आहे. त्यासाठी धर्मदाय आयुक्त विभागाना पुढाकार घेतला आहे.यासाठी धुळे येथे नुकतीच धार्मिक संस्थाच्या पदाधिकारींच्या उपस्थितीत बैठक झाली.सहाय्यक धर्मदाय आयुक्त आर. ए. लिप्ते अध्यक्षस्थानी होते.बैठकीत धार्मिक स्थळांनी सामूहिक विवाह सोहळे घेत सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. 

धर्मदाय आयुक्त कार्यालयात बैठक झाली.अधीक्षक डी.एस.चौरंगे, निरीक्षक सु.गो.गांगुर्डे, लेखापाल एस. पी. सोनारसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या परिपत्रकानुसार राज्यात प्रत्येक जाती-धर्माची धार्मिकस्थळे असून धार्मिकस्थळांकडे निधी असतो.धार्मिकस्थळांकडे असणारा निधी हा सार्वजनिक असून यानिधीचा सामाजिक कामासाठी करण्यात यावा असे शासनाने ठरवलं आहे.अशी माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री.लिप्ते यांनी बैठकीत दिली.समाजातील गरीब घटकातील मुलींच्या विवाहासाठी यानिधीचा चागंला उपयोग होऊ शकतो.शेतकरी आत्महत्येचे प्रमाण यातून कमी होऊन समाजात आपले कुणीतरी असल्याची भावना जागृत होईल.गरिबांचे सामूहिक विवाह हा धर्मदाय उद्देश आहे.

विश्वस्थांना आवाहन.....!
प्रत्येक धार्मिकस्थळांनी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.सर्व विश्वस्थाना सोबत घेत सामूहिक विवाह सोहळ्यासाठी समिती तयार करण्यात येणार आहे.समितीवर सहाय्यक धर्मदाय आयुक्त देखरेख करतील.लवकरच सामूहिक विवाहसोहळ्याचे ठिकाण,वेळ व तारीख जाहीर करण्यात येईल.बैठकीत प्रा.भरत काळे यांनी मागील सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजनाची माहिती दिली.

Web Title: Dhule news Spiritual places marriage