धुळे : चोर्‍यांचे सत्र अन् पोलिस प्रशासन ढिम्म

जगन्नाथ पाटील 
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

श्वान पथकचे नाट्य
कापडणे येथील चोरी झाल्या स्थळी श्वान पथक आले. श्वानने अर्धा किमी माग काढला.अन हतबलता दाखविली. त्यानंतर चोरी शोधासाठी किती प्रयत्न होत आहेत. हा आता संशोधनाचा नव्हे तर गुलदस्त्यातील भाग झाला माहे. श्वान पथक अाणूनही शोध लागत नसेल तर ते नाटक असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चिले जात आहे. श्वान अाणून चोरांच्या मनात काफरे भरविण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. हे पोलिस प्रशासनाला कळायला हवे. एवढे अज्ञानपण तरी त्यांच्याकडे नाही.

धुळे : जिल्ह्यात विविध ठिकाणी चोर्‍या आणि घरफोडींची मालिका सुरु झाली आहे. गावांमधील लहानसहान चोर्‍या तर पुढेही येत नाहीत. पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोर्‍या सुरुच आहेत. पोलिसांची बघ्याची भूमिका, पाठपुराव्याचा अभाव आणि गांभिर्याने न बघणे यांमुळे अवैध काम करणार्‍यांवर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याचे जिल्हाभरात चर्चिले जात आहे. सामान्य मात्र चोरीच्या भितीने भयभीत होत आहेत.

कुसुंबा, कापडणे व लामकानी या मोठ्या गावांमध्ये चोर्‍या झाल्यात. तिन्ही ठिकाणांवरील चोर्‍या धाडसीच आहेत. लामकानीतील चोरी अती धाडसीच आहे. घरामागून भगदाड पाडून ही चोरी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी येथे सराफाकडे लूट झाली होती. त्यानंतर ही घटना झाली आहे. धुळे, साक्री व शिरपूर येथेही अधूनमधून चोर्‍यांचे सत्र सुरुच असते. दुष्काळी स्थितीत चोर्‍यांचे प्रमाण वाढते. पण त्या भूरट्या चोर्‍या असतात. तीन्ही गावांमध्ये झालेल्या चोर्‍या धाडसीच आहेत.

श्वान पथकचे नाट्य
कापडणे येथील चोरी झाल्या स्थळी श्वान पथक आले. श्वानने अर्धा किमी माग काढला.अन हतबलता दाखविली. त्यानंतर चोरी शोधासाठी किती प्रयत्न होत आहेत. हा आता संशोधनाचा नव्हे तर गुलदस्त्यातील भाग झाला माहे. श्वान पथक अाणूनही शोध लागत नसेल तर ते नाटक असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चिले जात आहे. श्वान अाणून चोरांच्या मनात काफरे भरविण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. हे पोलिस प्रशासनाला कळायला हवे. एवढे अज्ञानपण तरी त्यांच्याकडे नाही.

चोर्‍या होतातच का ?
मुळतः राज्यातील नकाशावरील लहानशा जिल्ह्यात चोर्‍या होतातच कश्या याचे संशोधन झाले पाहिजे. अकुशल कामकारांना मोठ्या प्रमाणात रोजकार नसणे. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शेतावर राबण्यास व छोटीमोठी कामे करण्यास ना असणे. पण एन्जाॅयची सवय लागणे. त्यातूनही भूरच्या चोर्‍यांना प्रारंभ होतो. शेजारील मध्य प्रदेश व  उत्तर प्रदेशमधून येणार्‍यांची नोंद नाही. अनोळखी वस्तू विक्रेतांची व इसमांची विचारपूस होत नाही. अादी कारणे पुढे येतात. पण पोलिस प्रशासनाचा वचक नसणे हे एक महत्वपूर्ण कारण आहे. ते नाकारुन चालणार नाही.

पोलिस ठाण्यांचीही संख्या वाढवावी..
दुसरीकडे पोलिसांची अपुर्ण कुमक आणि पोलिस ठाण्या अंतर्गत येणार्‍या गावांची संख्या अधिक आहे. ती कमी करणेही महत्वपुर्ण ठरणार  आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या चारही तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोनने वाढविणे आवश्यक आहे. तसे होत नसल्यास प्रत्येक ठाण्या अंतर्गत मोठ्या गावांमध्ये पोलिस दूरक्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे. त्या भागातील पेट्रोलिंगमध्येही वाढ व्हायला हवी. तसे होतांना दिसत नाही. यात पोलिस प्रशासनासह राज्य शासनाचीही चालढकल आहे. याकडे गांभिर्याने बघितले जाईल. तो काळ गुंड व चोरांसाठी कर्दनकाळ आणि जनतेसाठी सुकाळ ठरेल.

Web Title: Dhule news thief and police