धुळ्यातून परराज्यातील दुधाचे टॅंकर परतवले 

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 2 जून 2017

मध्य प्रदेश व गुजरातकडून येणारी भाजीपाल्याची चार वाहनेदेखील आंदोलकांनी परत पाठविली. शेतकरी संपामुळे नंदूरबार, शहादा, शिंदखेडा व शिरपूरकडून शेतीमालाचे एकही वाहन धुळ्याकडे आले नाही

कापडणे : शेतकरी संपात आज (शुक्रवार) शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने सकाळी साडेनऊला मुंबई- आग्रा महामार्गावरील सोनगीर (ता. जि. धुळे) टोलनाक्याजवळ आंदोलन केले. त्यावेळी गुजरातहून हैद्राबादकडे जाणारे दूधाचे टॅंकर संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी परतवून लावले.

मध्य प्रदेश व गुजरातकडून येणारी भूसार व भाजीपाल्याची चार वाहनेदेखील आंदोलकांनी परत पाठविली. शेतकरी संपामुळे नंदूरबार, शहादा, शिंदखेडा व शिरपूरकडून शेतीमालाचे एकही वाहन धुळ्याकडे आले नाही. आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, रामकृष्ण पाटील, छगन पाटील, बंडू पाटील, साहेबराव वाघ, अरुण पाटील, जयवंत बोरसे, नारायण माळी, दिलीप पाटील आदींसह जिल्हाभरातील शेतकरी उपस्थित होते. टोल नाक्यावर पोलिस यंत्रणाही सज्ज होती. सं

घटनेने गुरूवारी दूध आेतणे, खासगी दूध संघाला कुलूप ठोकणे, चक्का जाम आंदोलन केले होते.

Web Title: Dhule News:Farmers strike