Dhule Municipal Corporation
sakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule Market Redevelopment : धुळे पाचकंदील मार्केट पुनर्विकासाला मंजुरी; कोर्टात कॅव्हेट दाखल, कार्यवाहीला 'स्टे' नाही
Administrative Approval for Redevelopment of Pachkandil Market : धुळेच्या पाचकंदील परिसरातील चारही मार्केटच्या पुनर्विकासाला महापालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर जुने मार्केट पाडण्याची प्रक्रिया वेग घेणार असून, गाळे व ओटेधारकांच्या पुनर्वसन व थकबाकी वसुलीचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
धुळे: शहरातील पाचकंदीलमधील चारही मार्केटच्या पुनर्विकासाला महापालिकेच्या प्रशासकीय महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जुने मार्केट महापालिकेला पाडावे लागणार आहे. या मार्केटमधील दोन ओटेधारक न्यायालयात गेले आहेत. महापालिकेनेही कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे मार्केटच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यवाहीला कोणताही स्टे नाही, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. दरम्यान, या मार्केटमधील गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून नोटीसवजा आवाहन करण्यात आले आहे.
