Crime
sakal
धुळे: शहरातील शिवाजी रोडवरील पांझरा नदी किनाऱ्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ ७२ तासांत उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह एकूण पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्याचा टिळा, चांदीची लगड आणि दानपेटीतील रकमेसह सुमारे ३९ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेत नंदुरबारमधील सराफाचाही समावेश आहे.