धुळे: महापालिका हद्दीतील मोराणे शिवारामधील पांझरा नदीपात्रात प्लॉटिंगसाठी मुरमाचा भराव करून डबरच्या वापरातून संरक्षक भिंत बांधली जात आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलणारे हे गैरकाम तत्काळ थांबवावे आणि निष्पक्ष चौकशीतून दोषींवर कारवाईची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.