Shobha Bachhav
sakal
धुळे: राष्ट्रीय महामार्ग तीनवरील धुळे- पिंपळगाव या प्रकल्पांतर्गत दहा वर्षे सुरू असलेल्या अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जा आणि अनियमिततेचा खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत भांडाफोड केला. धुळ्याच्या विकासाचा कणा असलेल्या या महामार्गाची दुर्दशा आणि प्रवाशांना होणारा त्रास त्यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर प्रश्नांच्या माध्यमातून मांडला. त्यांनी कॅग ऑडिटची सखोल तपासणी आणि बेजबाबदार अधिकारी व टोल कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही सक्त कारवाईचा आदेश यंत्रणेला दिला आहे.