property tax
sakal
धुळे: मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी धुळे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत समज देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानंतरही कर अदा केला नाही तर ऑक्टोबरपासून नियमानुसार आपल्याला नोटिसा देऊन कारवाई केली जाईल, असा इशाराही यातून देण्यात येत आहे. त्यामुळे काही थकबाकीदारांकडून लगोलग कर अदा केला जात आहे. मालमत्ता कर थकबाकीवर शंभर टक्के शास्तीमाफी तसेच दहा टक्के सवलतीची योजनाही ३० सप्टेंबरपर्यंत सुरू आहे.