Dhule News : धुळेकरांसाठी आनंदाची बातमी! धुळे-पुणे रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार; उड्डाणपुलाचाही प्रश्न सुटणार

Dhule-Pune Rail Service Set to Resume : धुळे-पुणे रेल्वे सेवा आणि मालेगाव रोडवरील उड्डाणपुलासंदर्भात मुंबईत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीनंतर लवकरच धुळेकरांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Dhule Pune railway

Dhule Pune railway

sakal 

Updated on

धुळे: धुळेकरांकडून मागणी होत असलेली धुळे- पुणे रेल्वे सेवा सुरू व्हावी आणि मालेगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपुलासाठी (रोड ओव्हर ब्रिज) सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत मंगळवारी (ता. २३) सकारात्मक बैठक झाली. तिचे फलित धुळे- पुणे रेल्वे सेवेला ‘हिरवा कंदील’ मिळणार आणि मालेगाव रोडवरील उड्डाण पुलाचाही प्रश्‍न सुटणार असल्याचा निर्णायक विश्‍वास या बैठकीतून व्यक्त झाल्याची माहिती खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com