Rabi Sowing
sakal
धुळे: यंदा सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पेरणीला उशिरा सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली. त्याची टक्केवारी २३.३४ टक्के आहे. रब्बीची पेरणी उशिरा होत असल्याने या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.