गोरख गर्दे धुळे: सहा महिन्यांपासून रेशन घेत नसलेल्या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २२ जुलैला लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार ही कठोर कारवाई होणार आहे. या आदेशानंतर आगामी तीन महिन्यांत ई-केवायसी व घरोघरी भेटींच्या माध्यमातून पात्रता तपासली जाणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन घेत नसलेले लाभार्थीदेखील या तपासणीत समाविष्ट असतील.