road demarcation
sakal
धुळे: ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि अतिक्रमणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महसूल विभागाने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. याअंतर्गत गावातील रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचे सीमांकन करून त्यांना विशिष्ट सांकेतिक (कोड) क्रमांक देण्यात येणार आहेत, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.