रंगरेषात रमले बालचित्रकार, सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

धुळेः बाल आणि थोरल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेली 'सकाळ'ची चित्रकला स्पर्धा २०२० आज गुलाबी थंडीतही रंगली. नियमावलीतील अनेक बदल 'टेक्नोसॅव्ही' होत विद्यार्थी, पालकांनी उस्फूर्त प्रतिसादतून स्वीकारले. शहरासह जिल्ह्यात विविध १६ केंद्रांवर झालेल्या या चित्रकला स्पर्धेत निरनिराळ्या गटातील हजारो विद्यार्थ्यांनी रंगरेषातून आपले भावविश्व उलगडले.

आश्रमशाळेच्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड प्रस्तूत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२० नियोजित केंद्रांवर सकाळी नऊला सुरू झाली. विशेष कुपन, ऑनलाइन नोंदणी आणि मोबाईलवरील क्यूआर कोडच्या सहाय्याने अत्यल्प दहा रूपये शुल्क आकारणीतून हा स्पर्धा झाली. आश्रमशाळेच्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश होता. 

आधी यथेच्छ दारूची पार्टी...मग चोरी

विविध विषयांवर रंगरेषातून आपले भावविश्व उलगडले

पहिली ते दहावीपर्यंतच्या विविध गटातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. चिमुकल्यांची कला पाहण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती. फुलपाखरू, वाढदिवसाचा केक, प्राणी, विदूषक, आजी, आकाशातील पतंग, कार्टून, किल्ला, पाण्याखालची जीवसृष्टी, वृक्षारोपण, शेकोटीभोवतीचे दृश्य, सुरक्षा विषयक पोस्टर्स, साहसी खेळ, निवडणूक प्रचार, रोबो कार्यशाळा चांद्रयान मोहीम यासह विविध विषयांवर स्पर्धक विद्यार्थ्यांनी रंगरेषातून आपले भावविश्व उलगडले.

अंत्ययात्रेला आला अन...सात वर्षानंतर सापडला 

नियोजित कालावधीत विविध रंगांच्या छटांनी चित्र साकारण्यात विद्यार्थी गर्क होते. केंद्रांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला.शैक्षणिक केंद्रांवरील शिक्षक वर्ग , सामाजिक कार्यकर्ते , काही पालकांच्या सहकार्याने स्पर्धा उत्साहात पार पडली. याकामी शिक्षण संस्थाचालकांचे विशेष सहकार्य लाभले. अशा सर्वांचे संयोजकांनी आभार मानेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhule sakal drawing competition 2020