Dhule Agriculture News : नव्या खरिपात कोरडवाहू पिकांचाच बोलबाला; साक्री तालुक्यात शेतकरी पुन्हा शेतीकामात गुंग

Dhule News : दुष्काळात होरपळून निघालेल्या बळीराजाला नव्या खरीप हंगामाची आस लागली असून शेतकरी पावसाची चातकासारखी प्रतिक्षा करत आहे.
Women of a farming family cracking groundnut pods for seeds. In the second photo, Kantilal Pawar doing intercropping in the field before sowing.
Women of a farming family cracking groundnut pods for seeds. In the second photo, Kantilal Pawar doing intercropping in the field before sowing.esakal

म्हसदी : गेल्या वर्षी दुष्काळात होरपळून निघालेल्या बळीराजाला नव्या खरीप हंगामाची आस लागली असून शेतकरी पावसाची चातकासारखी प्रतिक्षा करत आहे. खरिपाच्या नियोजनात शेतकरी व्यस्त आहेत. तर दुसरीकडे ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवत फक्त लढ म्हणा’ अशी निसर्गाकडे अपेक्षा व्यक्त करत प्रत्येक गोष्टीत सोशिकता दाखवणारा बळिराजा नव्या खरीप हंगामात तरी काही हाती येईल. (Sakri taluka farmers are again engaged in agricultural work)

या भाबड्या आशेने पुन्हा शेतीकामात गुंग झाला आहे. तालुक्याचे जून ते ऑक्टोबरचे पर्जन्यमान जेमतेम असते. गत वर्षी ४१० मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. खरिपातील तृणधान्यातील बाजरी, मका, ज्वारी, सोयाबीन व कडधान्याची सर्वच पिके करपून गेली होती. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

त्या अनुषंगाने बळिराजा काहीसा उत्साही असला तरी ‘गरजेल तो बरसेल का’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी खरीप हंगामात साक्री तालुक्यात एक लाख १८ हजार ५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने विभागाकडून बियाणे व खतांचे नियोजन सुरू आहे.

यंदा विहिरींना पाणीच नसल्याने बागायती क्षेत्रातील कपाशीचे क्षेत्र कमी झाले आहे. तेरा हजार नऊशे हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. शिवाय, मका, बाजरीच्या पेरणी क्षेत्रातही वाढीचा अंदाज आहे. यंदा ३२ हजार ७७७४ हेक्टरवर मका पेरणीची शक्यता आहे. बाजरी एकवीस हजार चारशे वीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल. (latest marathi news)

Women of a farming family cracking groundnut pods for seeds. In the second photo, Kantilal Pawar doing intercropping in the field before sowing.
Dhule Seed News : कापूस बियाणे सर्रास जादा दराने विक्री; आमदार रावलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

गेल्या वर्षी तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. गत वर्षी अत्यल्प पावसामुळे नदी, नाले, ओढे कोरडेठाक होते. शिवाय लघु प्रकल्प, पाझर तलावात जलसाठा टिकून राहिला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. बळिराजा भरउन्हात शेती मशागतीची कामे उरकत आहे. मॉन्सूनच्या बातम्या येऊन धडकल्या असून वातावरणही बदलू लागल्याने शेतकऱ्यांना खरिपाचे वेध लागले आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी बी- बियाणे नियोजन व खते खरेदी करत आहेत. शिवाय ग्रामीण भागात भुईमुगाचे घरचे बियाणे म्हणून शेंगा हाताने वा यंत्राद्वारे फोडून बियाणे तयार करून घेत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यास तालुक्यातील शेतकरी मका लागवड वा पेरणी करतील. त्या दृष्टीने तालुका कृषी विभागाने तयारीस वेग दिला आहे.

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरो...

हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देव करो आणि यंदा हवामान विभागाचा अंदाज शंभर टक्के खरा ठरो, अशी हात जोडून बळिराजा ईश्वरास प्रार्थना करत आहे. कारण दुष्काळाने शेतकरीच शेतमजूर, सामान्य होरपळून निघाले आहेत. यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शंभर वर्षात इतके प्रचंड तापमान अनुभवले नसल्याची माहिती नव्वदीपार केलेले बुजुर्ग देत आहेत. तालुका

Women of a farming family cracking groundnut pods for seeds. In the second photo, Kantilal Pawar doing intercropping in the field before sowing.
Dhule District Collector : मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्रीची दुकाने बंद! जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा आदेश

कृषी विभागाने खरीप हंगामात एक लाख अठरा हजार पन्नास हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यानुसार बियाणे आणि खतांची मागणी कंपन्यांकडे नोंदविली आहे. यंदा शेतकऱ्यांसाठी मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जातील. यामुळे त्याची टंचाई निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

"यंदा दुष्काळ, वाढत्या उष्णतेमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. वर्षभर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. यंदा लवकर आणि जोरदार पावसाचे संकेत वेधशाळेने दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नव्या खरीप हंगामाविषयी खूप अपेक्षा आहेत." - भटू नामदेव बेडसे, ज्येष्ठ शेतकरी, काकाणी (ता. साक्री)

Women of a farming family cracking groundnut pods for seeds. In the second photo, Kantilal Pawar doing intercropping in the field before sowing.
Dhule Lok Sabha Constituency : निकालाबाबत उत्सुकता शिगेला; आकडेमोड सुरुच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com