Election
sakal
धुळे: शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), पिंपळनेर (ता. साक्री) नगर परिषद आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू असली, तरी उमेदवार निश्चित करण्यात विलंब होत असल्याने निवडणुकीचे वातावरण स्पष्ट होत नाही. सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या याद्या जाहीर करण्याआधी प्रतिस्पर्धी कोण उभा करणार, आपल्या पक्षाचीच उमेदवारी न मिळाल्यास नाराज इच्छुकांची काय भूमिका असेल, याचा अभ्यास सुरू ठेवला आहे. पक्षांच्या ‘हायकमांड’कडून एबी फॉर्मसह हिरवा कंदील मिळेपर्यंत स्थानिक पातळीवरील इच्छुक कार्यकर्तेही थांबून आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या गतीवर प्रत्यक्ष परिणाम दिसला आहे.