Dhule Drought News : देवभाने धरणातून गाळ उचलण्यास वेग; धरण झाले कोरडे

Dhule Drought : देवभाने (ता. धुळे) येथील धरण पूर्णतः कोरडे झाले आहे. धरण परिसरातील विहिरी आटू लागल्या असून, बागायतीवर परिणाम झाला आहे.
Name and other systems for fish farming in the dam are lying down due to lack of water.
Name and other systems for fish farming in the dam are lying down due to lack of water.esakal

Dhule Drought News : देवभाने (ता. धुळे) येथील धरण पूर्णतः कोरडे झाले आहे. धरण परिसरातील विहिरी आटू लागल्या असून, बागायतीवर परिणाम झाला आहे. धरण परिसरातील गावांमध्ये मोठी पाणीटंचाई जाणवत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ उचलण्यास सुरवात केली आहे. मोठ्या प्रमाणात गाळ उचलला जात असल्याने या वर्षी धरणाची साठवणक्षमता वाढेल. मुंबई ते आग्रा महामार्गापासून दोन किलोमीटरवर देवभाने धरण आहे. (dhule Speed ​​to lift silt from Deobhane Dam )

जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेले हे धरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पूर्णतः कोरडे झाले होते. तेव्हापासून परिसरातील विहिरी व कूपनलिका आटू लागल्यात. भाजीपाल्यासह फळबागायतीला अधिक फटका बसला आहे. परिसरातील देवभाने, कापडणे, धमाणे, तिसगाव व ढंढाणे येथील पाणीटंचाई निवारण्यास हे धरण मोठा हातभार लावायचे. मात्र धरणच कोरडे झाल्याने या गावांमधील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

Name and other systems for fish farming in the dam are lying down due to lack of water.
Dhule Drought News : रब्बी, खरीपाने केली शेतकऱ्यांची निराशा; उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची मागणी

बेसुमार उपसा

या धरणातील पाण्याचा दर वर्षी बेसुमार उपसा होत असतो. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बेसुमार उपाशाला आळा घालणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने हेतुपुरस्सर कानाडोळा केल्याचे कापडणे येथील ग्रामस्थ सांगतात. धरणात अवैध वीजपंप ठेवले जातात. धरण आटेपर्यंत पाणी उचलणे सुरूच होते. याकडे मागणी करूनही प्रशासनाने लक्ष दिले नाही अन्यथा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मृत जलसाठा टिकला असता.

गाळ उपसा

काही लोकप्रतिनीधींच्या प्रयत्नांतून गाळ उपसण्यास परवानगी मिळाली. गेल्या पंधरा दिवसांपासून जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने गाळ उचलला जात आहे. शेतकरी स्वखर्चाने गाळ उचलत आहेत. हा गाळ शेतीसाठी सुपीक असल्याने मोठ्या प्रमाणात उचलला जात आहे. दरम्यान, अद्याप पावसाळा सुरू व्हायला तीन आठवडे शेष आहेत. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात गाळ उचलला जाणार आहे. धरणातील पाणी साठवणक्षमता वाढणार आहे.

Name and other systems for fish farming in the dam are lying down due to lack of water.
Dhule Drought News : सोनगीर परिसरात मासेमारी ठप्प; धरणे, तलाव एप्रिलमध्येच कोरडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com