MSRTC bus
sakal
धुळे: गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘लालपरी’ सध्या समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. देखभाल-दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी बसच्या अपघातांचे प्रमाणदेखील वाढले असून, धुळे विभागातदेखील हेच चित्र पाहायला मिळत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत धुळे एसटी विभागात १२२ अपघातांच्या घटना घडल्या असून, यामध्ये आठ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.