Dhule Drought News : दुष्काळाचा फटका आठवडेबाजारांनाही; उन्हामुळे वर्दळ नगण्य

Dhule News : यंदाच्या दुष्काळाचा परिणाम अनेक घटकांवर होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या उन्हाचा फटका ग्रामीण भागातील आठवडेबाजारांनाही बसला आहे.
vegetable markets (file photo)
vegetable markets (file photo)esakal

म्हसदी : यंदाच्या दुष्काळाचा परिणाम अनेक घटकांवर होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या उन्हाचा फटका ग्रामीण भागातील आठवडेबाजारांनाही बसला आहे. एरवी ग्रामीण भागात आठवडाभरासाठी भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंची एकाच ठिकाणी खरेदी केल्या जाणाऱ्या आठवडेबाजारात दुपारी शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. (summer has also hit weekly vegetable markets in rural areas)

विहिरींच्या पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने भाजीपाला उत्पादन घटले आहे. विक्रीसाठी तोकडा भाजीपाला, वाढत्या उष्णतेमुळे आठवडेबाजारातील वर्दळ उन्हात नगण्य, तर सायंकाळी बऱ्यापैकी दिसत असल्याचे चित्र आहे. अलीकडे ग्रामीण भागात बहुतेक लहान गावांमध्ये आठवडेबाजार भरत आहे.

स्थानिक ठिकाणी आहारातील सर्व प्रकारचा हिरवा भाजीपाला, कडधान्यांच्या डाळी, लाल मिरची, मसाल्याचे पदार्थ, मिठाई, सुकामेवा, मटण, चिकन, मासे विक्रेते दिवसभर दुकाने थाटतात. आठवडेबाजारात दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा दुष्काळी परिस्थिती, वाढत्या उन्हाचा परिणाम ग्रामीण भागातील आठवडेबाजारावर होऊ लागला आहे. बहुतेक ठिकाणच्या आठवडेबाजारात दुपारचे ऊन उतरल्यावर सायंकाळी पाचनंतर वर्दळ वाढते.

आठवडेबाजार शेतकऱ्यांचे हक्काचे मार्केटच

आठवडेबाजारात स्थानिकसह परिसरात शेतकरी ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणतात. काही स्वतः विक्री करतात, तर काही किरकोळ व्यापाऱ्यांना विकून मोकळे होतात. यंदा अत्यल्प पावसामुळे विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने स्थानिक मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करतात. (latest marathi news)

vegetable markets (file photo)
Dhule ZP News : संच मान्यतेच्या नवनिकषामुळे धोक्याची घंटा! शिक्षकांचा जीव टांगणीला; आहे ते टिकविण्याची कसोटी

यंदा तर परजिल्ह्यातील भाजीपाला ग्रामीण भागात विक्रीसाठी आणला जात आहे. उन्हाचा वाढता तडाखा पाहता बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली आहे. दुसरीकडे बाजारात मिळणारा भाजीपाला बाहेरून आणावा लागत असल्याने तो महाग मिळतो. खरेदी करणारे ग्राहकदेखील ऊन कमी झाल्यावर सायंकाळी पाचनंतर घराबाहेर पडताना दिसतात.

अलीकडे विक्रेते आपल्या दारी, याप्रमाणे संसारोपयोगी अनेक वस्तूंचे विक्रेते गल्लोगल्ली फिरतात. दिवसभरात अगदी घराजवळ भाजीपाल्यासह सर्वच वस्तू मिळत असल्याने आठवडेबाजारावर फारसे कोणी अवलंबून राहत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या गावांमध्ये आठवडेबाजार भरतात.

अलीकडे तर काही ठिकाणी लहान गावातही आठवडेबाजारात बाजाराचे चित्र दिसते. ज्या दिवशी आठवडेबाजार भरतो त्या दिवसाची वेगळी असते. साक्री तालुक्यात साक्रीसह म्हसदी, वार्सा, कुडाशी, पिंपळनेर, छडवेल-कोर्डे, निजामपूर, कासारे आदी मोठ्या गावांतील आठवडेबाजार विशेष प्रसिद्ध आहेत.

vegetable markets (file photo)
Dhule News: करवसुलीच्या आकड्याला ‘तगाद्या’ची भीती! पाणीपट्टी थकबाकीचा प्रश्‍नही गंभीर; अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज

सर्वच मिळत कधीही अन् कुठेही

पूर्वी ग्रामीण भागात आठवडेबाजार म्हणजे खरेदीची पर्वणी मानली जात असे. अगदी बस्त्यापासून तर नवरीला देण्यासाठी (मूळ) भांड्याचा संसार, कपड्यांचे बस्तेही आठवडेबाजारात खरेदी केले जायचे. आज एकाच छताखाली सर्व काही म्हणजेच मॉल संस्कृतीमुळे बाजारातील खरेदीचा आनंद विस्मृतीत गेला आहे.

आठवडेबाजारातील चिमुकल्यांचा आनंदही हिरवला गेल्याचे चित्र आहे. शेतातच पिकत नसेल विकायला काय येईल अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. अनेक जण ताजा भाजीपाला खरेदी करण्याला भर देतात. गल्लोगल्ली फिरत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ताजा भाजीपाला खरेदी केला जातो.

प्रत्येक गाव व खेड्यांमध्ये स्थानिक पातळीवर लहान बाजारपेठा विकसित झाल्या. सर्वच प्रकारचा किराणा माल, जीवनावश्यक वस्तू गावात मिळू लागल्या. त्यामुळे बाजारहाट करून आठवड्याचे नियोजन करण्याचे दिवस कालबाह्य होत चालले आहेत. हा मोठा फटाका आठवडेबाजारांना बसला आहे.

"दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाला मिळत नाही. विहिरींना‌ पाणी नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. आज जगाचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजा शेती व्यवसायात अडचणीत सापडला आहे. बाहेरून येणारा भाजीपाला महाग मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे ग्राहक संख्या रोडावली आहे." -रुस्तम टेलर, किरकोळ भाजीपाला विक्रेता, म्हसदी

vegetable markets (file photo)
Dhule Digital Crop Survey : धुळे जिल्ह्यात ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’; शेतकऱ्यांनी बिनचूक माहिती द्यावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com