Dhule Summer Heat : किमान तापमानही वाढल्याने ‘वैताग’; विजेच्या लपंडावाने त्रासात भर

Dhule News : उन्हाळा जसजसा पुढे सरकतोय तसा त्रासही वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाहीलाही होत आहे.
minimum temperature increases
minimum temperature increasesesakal

Dhule News : उन्हाळा जसजसा पुढे सरकतोय तसा त्रासही वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाहीलाही होत आहे. दिवसा उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर किमान रात्री उकाड्यापासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असते. (Dhule summer heat As minimum temperature also increases)

मात्र गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानही वाढल्याने नागरिक हैराण आहेत. त्याच विजेच्या लपंडावाने भरच घातली आहे. एप्रिलच्या सुरवातीपासूनच धुळ्यातील तापमानाचा पारा वाढत असल्याचे पाहायला मिळाले. कमाल तापमान ४० अंशसेल्सिअस व त्यापुढेच जात आहे. सुरवातीला रात्रीचे अर्थात किमान तापमान कमी असल्याने थोडा दिलासा होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानातही वाढ झाल्याने त्रासात भरच पडली आहे. दिवसा अगदी सकाळपासूनच कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. दुपारी तर अक्षरशः चटके देणारे ऊन पडत आहे. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ पाहायला मिळते.

डांबरी रस्त्यावरून जाताना अक्षरशः अंगाला वाफा लागतात. त्यामुळे सुटीच्या दिवशी तर शुकशुकाट पाहायला मिळतो. उन्हाच्या या तडाख्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच छोटे व्यावसायिक, भाजीपाला विक्रेत्यांना याची चांगलीच झळ बसत आहे. (latest marathi news)

minimum temperature increases
Dhule District Collector : भूमिअभिलेख विभाग बळकटीसाठी निधी देऊ : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

विजेचा लपंडाव

वाढत्या तापमानातून दिलाशासाठी घराघरांत, ऑफिसेस, दुकानांमध्ये पंखे, कूलर, एसी चालतात. यामुळे किमान थोडा दिलासा मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विजेचाही लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण आहेत. रात्रीही अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे त्रासात भरच पडत आहे.

तापमानाचा पारा असा

८ एप्रिल- ३९.०/१५.४

९ एप्रिल- ३९.०/१८.६

१० एप्रिल- ४०.०/२२.०

११ एप्रिल- ३९.०/२२.०

१२ एप्रिल- ३७.०/२२.०

१३ एप्रिल- ३८.०/२३.०

१४ एप्रिल- ३८.०/२३.०

१५ एप्रिल- ४०.०/२१.०

१६ एप्रिल- ४२.०/२२.५

१७ एप्रिल- ४२.५/२४.०

minimum temperature increases
Dhule Lok Sabha Constituency : 'लोकसंग्राम', जनता दलामुळे काँग्रेस पक्षाचे स्वप्न धुळीस!

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com