Teacher Transfer
sakal
धुळे: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी राबविलेली ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये एकूण एक हजार ७४ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या. त्यांना सोमवारी (ता. ८) कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे संबंधित शिक्षकांना त्यांच्या नवीन कार्यस्थळी रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.