Dhule Drought News : दुष्काळ, वाढत्या उष्णतेमुळे म्हसदीच्या वनक्षेत्रास ‘ग्रहण’

Dhule Drought : ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द जणू आता परवलीचा झाला आहे. दुष्काळ, वाढते तापमान व त्याच्या दुष्परिणामाविषयी सातत्याने विविध स्तरांवर केवळ चर्चा केली जाते.
Depleted pimpramal forest area near Kayakanda dam due to drought conditions.
Depleted pimpramal forest area near Kayakanda dam due to drought conditions.esakal

Dhule Drought News : ‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द जणू आता परवलीचा झाला आहे. दुष्काळ, वाढते तापमान व त्याच्या दुष्परिणामाविषयी सातत्याने विविध स्तरांवर केवळ चर्चा केली जाते. यंदाच्या दुष्काळाचा मोठा फटका वनसंपदेलाही बसला आहे. वन विभाग, वन‌ व्यवस्थापन समित्या व ग्रामस्थांच्या सहभागाने फुलविलेल्या वनसंपदेला गतवैभव प्राप्त करण्याची वेळ आली आहे. ( This year drought has also hit forest resources )

दुष्काळामुळे यंदा कोरडीठाक झालेली वनतळी, नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध असणारा रानमेवा, अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती नसल्याने यंदा वनसंपदेला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. म्हसदी ते शेंदवड मांजरीपर्यंत हजारो हेक्टर वनक्षेत्र आहे. ग्रामस्थांचा लोकसहभाग, स्थानिक वनव्यवस्थापन समित्यांचा प्रयत्न आणि वन विभागाच्या जाचक कायद्यामुळे दर वर्षी वने बहरतातदेखील, पण यंदाच्या दुष्काळाचा परिणाम जंगलसंपत्तीवरही झाला आहे.

शासन, वन विभाग दर वर्षी शत कोटी वृक्षलागवडीसह अन्य विविध योजनांच्या माध्यमातून जुलैमध्ये विविध प्रकारची रोपे लावून पर्यावरणाच्या दृष्टीने प्रयत्नही करते. शिवाय वनक्षेत्रासह स्थानिक ठिकाणच्या पडीक जमिनी, गावालगतच्या ‘गायरान’ क्षेत्र, शाळा-महाविद्यालयातही वृक्ष लागवडीसाठी शासन यंत्रणा नेहमीच आग्रही असते. वनक्षेत्राला दुष्काळामुळे लागलेले ग्रहण कमी करण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी यंदाही अधिकाधिक वृक्षलागवड काळाची गरज आहे.

म्हसदीसह परिसरातील जंगल क्षेत्रात सातत्याने वृक्षलागवडीवर भर देणे आवश्यक आहे. वनक्षेत्राचे ‘गतवैभव’ प्राप्त व्हावे म्हणून सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. विशेष म्हणजे म्हसदीकरांनी या जंगल क्षेत्रातील वेगवेगळ्या रंजक नावांनी वेगळी ओळखही मिळवून दिली आहे. वाढते तापमान व त्याचे विविध घटकांवर होणारे परिणाम यंदा दुष्काळी स्थितीमुळे अधिकच गडद झाले आहेत. (latest marathi news)

Depleted pimpramal forest area near Kayakanda dam due to drought conditions.
Dhule Drought News : शासकीय मदतीपासून बळीराजा ‘वंचित’च; कांदा, मका पीकविम्याची दमडीही खात्यावर जमा नाही

वन विभागाच्या सतर्कतेमुळे परिसरातील हजारो हेक्टर वनक्षेत्रात विविध प्रकारची वृक्षराजी फुलली आहे. यामुळे वन्यपशूंसह वन्यप्राण्यांचाही मुक्त संचार आहे. जंगलातील विविध भागांना म्हसदीकरांनी रंजक नावांनी वेगळी ओळखही प्राप्त करून दिली आहे. वन विभागाच्या दप्तरी तशी नोंद नसली, विशिष्ट विभागातील जागेला त्या-त्या नावाने आजही ओळखले जाते हे विशेष.

नावावर ठिकाणाची ओळख

काही वर्षांपूर्वी म्हसदीलगत अति घनदाट जंगल होते. त्या काळी गावात हिंस्र प्राणी दाखल होत असल्याचा दाखला बुजुर्ग चर्चेत देतात. जंगल परिसरात पिंप्रामाळ, धंगाईचा माळ, ब्राह्मण्यामाळ, अक्कलदर या नावाचे मोठे डोंगर आहेत. या डोंगरांवर व डोंगरलगत मोठे वनक्षेत्र आहे. यंदा दुष्काळामुळे वनक्षेत्रे ओस पडली आहेत. त्याला ग्रामीण बोलीभाषेत विविध प्रकारची रंजक नावे आहेत. प्रत्येक नावाला वेगवेगळी कारणेही असल्याचे सांगितले जाते.

पिंप्रामाळ डोंगरापाशी घोकांट, पांदेर, बोळ्याचा तोंडा, लवणदरा, केवडदरा, वाघिणी, वाघाचे बीळ, बैलदरा, मोरदरा, दोमदेर, देवधर अशी भिन्नभिन्न प्रकारची नावे प्रचलित आहेत. धंगाईचा माळ परिसरात महुदरा, चिचदर, सातवड, डुबकीनाला, झिरणीची डाब, नळटाका, बागडी, हिराळा अशी नावे आहेत.

Depleted pimpramal forest area near Kayakanda dam due to drought conditions.
Dhule Drought News : सातपुड्यातील आदिवासींवरही रोजगारासाठी भटकंतीचा वेळ

ककाणी रस्त्यालगतच्या जंगल परिसराला ब्राह्मण्यामाळ, गुलबल्या, सापट्या म्हणून डोंगर परिसर आहे. अन्य ठिकाणच्या परिसराला कायकंडा, खेड्याचे खोरे, अक्कलदर, आगाशा, सपाटदरा, मोरदरासारखी रंजक नावे जडली आहेत. ज्या ठिकाणी दाट झाडी असतील त्या ठिकाणी वाघाचे अस्तित्व असते, असे जुने जाणकार आजही सांगतात. त्याला ‘वाघिणी’ असे म्हटले जाते.

पावसाअभावी जंगले ओस

यंदा अत्यल्प पावसामुळे शेतीच काय जंगलसंपत्तीचा ऱ्हास होत असल्याचे चित्र आहे. यंदा ऐन पावसाळ्यातही वनतळी कोरडीठाक होती. डोंगर सपाटीवर ही वनतळी असून, जोरदार पाऊस झाला तर वर्षभर जलसाठा उपलब्ध असतो. यंदा पावसाळ्यात एकदाही जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा टिपूस नाही.

वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाल्याचे चित्र आहे. पावसाअभावी जंगले ओस पडल्याची भयावह स्थिती आहे. तथापि, नैसर्गिक पद्धतीच्या वनतळ्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. दुरस्ती झाल्यास जंगल क्षेत्रात मोठ्या संख्येने वनसंपदा तर वाढेलच शिवाय पशू-पक्ष्यांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे.

Depleted pimpramal forest area near Kayakanda dam due to drought conditions.
Dhule Drought News : दुष्काळाचा फटका आठवडेबाजारांनाही; उन्हामुळे वर्दळ नगण्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com