Dhule Crime : कारमधून गांजा वाहतूक; मुंबई- आग्रा महामार्गावरून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime : मुंबई- आग्रा महामार्गावरून कारमधून होणारी गांजाची तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली.
Crime News
Crime Newssakal
Updated on

धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावरून कारमधून होणारी गांजाची तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील चालकास ताब्यात घेत ११ किलो गांजा आणि कार, असा एकूण पाच लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (ता. ७) रात्री पावणेआठच्या सुमारास ही कारवाई झाली. (Transportation of ganja by car from Mumbai Agra highway worth five lakh seized )

मुंबई-आग्रा महामार्गावरून कारमधून (एमएच ०४, जीजे ३३८४) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजासदृश्य अमली पदार्थाची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. त्या पार्श्वभूमीवर पथकाला कारवाईचे निर्देश दिले.

Crime News
Dhule Crime : बँकेतून 5 लाख लांबविणाऱ्यांना अटक; साक्रीतील युनियन बँकेत घटना

पथकाने आर्वी (ता. धुळे) दूरक्षेत्रासमोर संशयित कारला पकडले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात प्लॅस्टिक गोणीमध्ये ११ किलो गांजा मिळून आला. दोन लाख ४२ हजारांचा गांजा व तीन लाखांची कार जप्त केली. तसेच कारचालक अन्सार मुसा पठाण (वय ४१, रा. तुळजापूर देवी मंदिराजवळील, बुहराननगर, नगर) याला अटक केली. रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Crime News
Dhule Crime : वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तालुका पोलिसांची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com