Dhule Unseasonal Rain : वादळी पावसामुळे बाळ दगावले

child death
child deathesakal
Updated on

Dhule News : उमरपाटा (ता. साक्री) येथे बुधवारी सायंकाळी चक्रीवादळासह पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Dhule Unseasonal Rain Baby died due to stormy rain news)

बुधवारी (ता. ३) सायंकाळी पाचला ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होऊन परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याचे तसेच शेतातील कांदा, भाजीपाला, डांगरमळे यांचे मोठे नुकसान झाले.

येथील गावठाण पाड्यातील विशाल मगन देसाई यांच्या घराच्या पत्र्यांसह अँगल वादळात ७० ते ८० फूट लांब उडून गेले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

child death
Dhule News : 3 वर्षांपूर्वी मंजूर स्मशानभूमी कागदावरच; ग्रामस्थांची कुचंबणा

त्याच पत्र्याच्या अँगलला लहान मुलांसाठी झोळी बांधली होती, त्या झोळीसह अँगलही उडून गेल्याने तीन महिन्यांचे बाळ गंभीर जखमी झाल्याने धुळे येथील हिरे मेडिकलला पाठविण्यात आले होते.

त्या बाळाचे बुधवारी पहाटे साडेतीनला निधन झाले. या वेळी उमरपाटा ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र देसाई व ग्रामपंचायत सदस्य हुरजी मावळी तसेच तलाठी यांनी पंचनामा केल्याचे समजते.

child death
Dhule Crime News : हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com