Dhule Unseasonal Rain Damage : वादळ, अवकाळीचा 205 हेक्टर शेतीला फटका

Dhule News : तालुक्यात १२ एप्रिलला झालेले वादळ आणि अवकाळी पावसाचा २०५ हेक्टर शेतीला फटका बसला आहे.
A banana plantation that was destroyed.
A banana plantation that was destroyed.esakal

शिरपूर : तालुक्यात १२ एप्रिलला झालेले वादळ आणि अवकाळी पावसाचा २०५ हेक्टर शेतीला फटका बसला आहे. केळी व पपईच्या बागांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, एकूण २८७ शेतकरी बाधित झाले आहेत. (Dhule Unseasonal Rain Damage marathi news)

१२ एप्रिलच्या दुपारी तालुका आणि शहरात जोरदार वादळ आणिक अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाच्या आदेशानुसार, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे युद्धपातळीवर पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला. त्यात २८७ शेतकऱ्यांच्या २०५.१५ हेक्टर शेतावरील पिके नेस्तनाबूद झाल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.

पीकनिहाय ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राचे पंचनामे महसूल, कृषी विभागातर्फे करण्यात आले. पीकनिहाय कंसात बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि क्षेत्र असे ः

गहू (१, ०.६ हेक्टर), रब्बी ज्वारी (५, ५.६० हे.), बाजरी (२१, १५.५० हे.), मका (३२, २४.३० हे.), कांदा (३१, २२ हे.), केळी (१५६, १०८.६५ हे.), पपई (३६, २३.७० हे.), लिंबू (२, २.८० हे.), पेरु (१, ०.८० हे.), भाजीपाला (२, १.२० हे.).  (latest marathi news)

A banana plantation that was destroyed.
Nandurbar Unseasonal Rain Damage : शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचल्या डॉ. हिना गावित

सलग नुकसान

यापूर्वी १ मार्चला वादळ आणि पावसामुळे तालुक्यातील केळी, पपईसह विविध पिके भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले होते. पंचनामे झाल्यानंतर बाधित शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळालेला नाही. प्रशासनाचे पंचनामे म्हणजे केवळ औपचारिकता ठरू नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

A banana plantation that was destroyed.
Dhule Unseasonal Rain Damage : शिंदखेड्यात लिंबू, केळीची बाग भुईसपाट! वादळी वाऱ्याचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com