Crime
sakal
धुळे: महिलेला पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन ती गुंगीत असताना एका संशयिताने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना देवपूरमधील वलवाडी परिसरात घडली. हा घृणास्पद प्रकार करून त्याचे व्हिडीओ चित्रणही केले व त्याद्वारे महिलेला ब्लॅकमेल केले. तिच्याकडून सुमारे ६० लाख रुपये उकळले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला अटक केली.