Dhule
sakal
धुळे: भारतीय जनता पक्षाच्या येथील महापालिकेच्या सत्ताकाळात धुळेकरांना रोज पिण्याचे पाणी देण्यासाठी तब्बल ३०६ कोटींचा निधी खर्च झाला. तरीही रोज पाणी मिळत नाही. यात वरकडी म्हणजे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आता तापी पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी २२८ कोटींच्या निधीची मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.