Dhule Water Shortage : मालपूर येथील अमरावती धरण 10 वर्षांत प्रथमच कोरडेठाक; विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त

Water Shortage : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरण दहा वर्षांत पहिल्यांदाच पूर्ण कोरडेठाक पडले आहे.
Amaravati dam has gone dry for the first time in ten years.
Amaravati dam has gone dry for the first time in ten years.esakal

Dhule Water Shortage : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरण दहा वर्षांत पहिल्यांदाच पूर्ण कोरडेठाक पडले आहे. दुष्काळी शिंदखेडा तालुक्यात यंदा कापूस लागवडही घटणार आहे. दरम्यान, विहिरीत जलसाठ्यानेही तळ गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिसरात पाण्याचा शाश्वत स्वरूपात स्रोत नसल्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. गेल्या दहा वर्षांनंतर या वर्षी अमरावती धरणातील साठा कमी कमी होत चालला आहे. ( Amravati Dam at Malpur is dry for first time in 10 years )

गेल्या अठरा वर्षांपूर्वी धरण बांधले गेले आहे. शेतशिवाराचे योग्य ते सिंचन झाले नाही. अमरावती नदीवरील या धरणाचे पाणलोट क्षेत्र २५ किलोमीटरपेक्षा जास्त नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर धरण अद्याप पूर्ण क्षमतेने कधीच भरू शकत नाही. परिणामी सिंचन क्षेत्र कधीच वाढले नाही. तीन हजार हेक्टराला सिंचनाखाली आणले जाईल असे नियोजन केले गेले आहे; परंतु हजार हेक्टरसुद्धा अद्याप शेतीचे सिंचन झाले नसल्याची खंत शेतकऱ्यांना आहे.

दर वर्षी पर्जन्यमान कमी होत चालले आहे. येणाऱ्या वर्षात चांगला पाऊस झाला नाही तर पाण्याची भीषणता वाढणार आहे. दर वर्षी थोडाफार पाणीसाठा होत होता. तोही सोडून देण्यात आला. यंदा टिपूसभरही पाणीसाठा झाला नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विहिरीतील पाणीपातळीने तळ गाठला. अर्धा तास उपसा होईल, ठिबक सिंचनाद्वारे कापूस मे महिन्यात लागवड होईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा मावळली आहे. (latest marathi news)

Amaravati dam has gone dry for the first time in ten years.
Water Shortage : रिसोड तालुक्यातील 40 गावे तहानेने व्याकूळ

कुठेतरी नवीन विहीर खोदली जाईल, कूपनलिका केली जाईल, त्यातून पाणी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना नाही. हा परिसर अवर्षणप्रवण भागात असल्याने जमिनीत खोल जाऊनही पाण्याचा स्रोत सापडणे कठीण झाले आहे. पंधरा-वीस फुटांवर काळा पाषाण खडक लागतो. तो फोडून पाणी मिळविण्यासाठी धडपड असते.

शेतीच्या सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, धरण, नदीनाले, जलयुक्त शिवारातील बंधारे अनेक वर्षांपासून कोरडे पडले आहेत. भविष्यकाळात शाश्वत स्वरूपात पाणी बारामाही उपलब्धतेसाठी प्रलंबित योजना कार्यान्वित केल्या पाहिजेत, अन्यथा येणाऱ्या काळात पाणीबाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आजघडीला अर्धा तालुका पाणीटंचाईच्या खाईत सापडला आहे.

सामुदायिक प्रयत्नांतून प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना युद्धपातळीवर पूर्ण झाली पाहिजे, तापी नदीवरील बंद पडलेल्या उपसा सिंचन योजनेची कामे वर्षभरात पूर्ण करून शेती सिंचन वाढविले पाहिजे, सुलवाडे-जामफळ योजनेच्या कामाची गती वाढविली पाहिजे, पंचाऐंशी गावांतील ग्रिड योजना या योजनेसह अन्य पाणीयोजना पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तरच शाश्वत स्वरूपात पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे.

Amaravati dam has gone dry for the first time in ten years.
Dhule Water Shortage : सोनगीरला पाणीटंचाई..! महिन्यात फक्त तीनदा नळांना पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com