धुळे- होलिकोत्सवानिमित्त अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्यांचे वाटप करण्याची शासनाने फेब्रुवारीत घोषणा केली होती. मात्र, निकषानुसार प्रत्यक्षात जिल्ह्यातील केवळ ६३.२५ टक्के महिलांनाच साड्या मिळाल्या आहेत. उर्वरित ३६.७५ टक्के महिलांना वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे.