धुळे- महापालिकेने सुधारित मालमत्ता कर लागू करून वसुली सुरू केली असली तरी नेहमीप्रमाणे करवसुलीला अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी असल्याने प्रशासनापुढे आर्थिक संकट कायम आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या या प्रश्नावर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होण्याची गरज आहे.