गरोदरपणात पाचपैकी एका महिलेस मधुमेह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जळगाव - मधुमेह हा आजार मोठ्यांबरोबरच सर्व वयोगटांमध्ये आढळत आहे. फास्टफूडचे अतिसेवन, अपूर्ण झोप, न पेलणारे ताणतणाव या साऱ्यांचा परिणामस्वरूप शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. महिला आणि पुरुषांचा विचार केल्यास हे प्रमाण सारखे असले तरी गरोदरपणात पाचपैकी एका महिलेस मधुमेहाचा त्रास उद्भवतोय. आजही मधुमेह होऊनही त्याचा त्रास होत नसल्याने जवळपास ५० टक्‍के नागरिकांना त्याची माहितीच नसते. प्रामुख्याने आनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, मानसिक ताणतणाव, अतिचरबीयुक्‍त खाणे ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. 

मधुमेह झाल्यानंतर वारंवार तहान लागणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे, सांधे दुखणे, मुंग्या येणे, कामात उत्साह न वाटणे, नजर कमी होणे, जखम लवकर बरी न होणे अशी लक्षणे आढळतात. मधुमेहामुळे प्रामुख्याने हृदयविकाराचा धोकादेखील संभवतो. साधारण ५० टक्‍के मधुमेही रुग्णांना रक्‍तवाहिन्या ब्लॉक होणे, मेंदूचा विकार, किडनी विकार आणि हृदयविकाराचा त्रास जाणवतो.

गरोदरपणात महिलांमध्ये हार्मोन्स वाढत असल्याने साखर नियंत्रित करणे शक्‍य नसल्याने मधुमेहाची शक्‍यता अधिक असते. हे टाळण्यासाठी चालणे, पोहणे, जिमला जाणे आवश्‍यक आहे.  
- डॉ. अमित राजपूत, मधुमेहतज्ज्ञ

Web Title: Diabetic woman with one in five pregnancies