माध्यमिक शाळा डिजिटल करा - देविदास महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

जळगाव - जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. तो पुन्हा वाढविण्यासाठी शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करा, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी केले.

जळगाव - जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. तो पुन्हा वाढविण्यासाठी शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करा, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’अंतर्गत माध्यमिक स्तराबाबतची माहिती मुख्याध्यापकांना व्हावी यासाठी कांताई सभागृहात आज जिल्ह्यातील खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी अरुण पाटील, विकास पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. 

शासनाकडून अनेक निर्णय नव्याने घेतले जात आहेत. मात्र, ते निर्णय शाळांपर्यंत पोहोचविले जात नसल्याची खंत शिक्षणाधिकारी महाजन यांनी व्यक्त केली. माध्यमिक शाळांमधून दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत आहेत. पालकांचा माध्यमिक व मराठी शाळांवरील विश्वास कमी होत आहे. तो विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी केले.

या विषयांवर झाली चर्चा 
या सहविचार सभेत ई-गव्हर्नन्स संबंधित कामे व कार्यवाही, जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेचे आयोजन करणे व कौशल्य सेतू योजना, शालेय पोषण आहार योजना कार्यवाही, अतिरिक्त कर्मचारी समायोजन, संकलित चाचणी गुणनोंद, अल्पसंख्याक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती याबाबत चर्चा केली. 

मुख्याध्यापक उगलेंना आली भोवळ
सहविचार सभेनंतर चाळीसगाव तालुक्‍यातील मुख्याध्यापक उगले हे चाळीसगावला जाण्यासाठी जळगाव रेल्वेस्थानकावर आहे. तेथे त्यांना अचानक चक्कर (भोवळ) आल्याने ऑर्किड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, उपशिक्षक एस. पी. ठाकूर यांच्यासह शिक्षकांनी रुग्णालयाला भेट दिली.

Web Title: The Digital Secondary School