नाशिक - फलोत्पादन विकास योजनेत दिंडोरी तालुका अव्वल

दिगंबर पाटोळे
बुधवार, 18 एप्रिल 2018

वणी (नाशिक) : फलोत्पादन विकास योजना राबविण्यात संपुर्णं जिल्हयात दिंडोरी तालुका अव्वल असून कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आधूनिक पध्दतीने यांत्रिकी शेती करावी असे प्रतिपादन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले. 

वणी (नाशिक) : फलोत्पादन विकास योजना राबविण्यात संपुर्णं जिल्हयात दिंडोरी तालुका अव्वल असून कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आधूनिक पध्दतीने यांत्रिकी शेती करावी असे प्रतिपादन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले. 

दिंडोरी तालूक्यातील अहिवंतवाडी येथे तालूका कृषी विभागाच्या वतीने आयोजित उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिम व एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत ट्रॅक्टर व कृषी औजारे वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गंत दिंडोरी तालुका कृषी विभागाच्या वतीने पारदर्शकपणे यांत्रिकीकरण योजनेतंर्गत ट्रॅक्टर, भात सोंगणी यंत्र, रोटाव्हेटर, भात मिल व शेती अवजारांचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांनी पारंगत शेती न करता यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त अवलंब करून आधुनिक पध्दतीने शेतीव्यवसाय करून उन्नती साधावी असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.    

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टर व कृषी अवजारे वितरण करण्यात आले. कार्यक्रम प्रंसगी तहसिलदार बाबासाहेब गाढवे ,उपविभागीय कृषी अधिकारी दिलिप देवरे, पंचायत समिती सभापती एकनाथ गायकवाड, उपसभापती उत्तम जाधव, तालूका कृषी अधिकारी विलास सोनवणे, सरपंच निर्मला गवळी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित उपस्थित होते. यावेळी तालूका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, कृषी यांञिकरण योजनेतंर्गत 12 ट्रॅक्टर, तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत 49,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत 29 असे एकूण 90 ट्रँक्टर व एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत यांञिकरण योजनेतून एकून 72 ट्रँक्टरचे लाभ शेतकरी बांधवाना देण्यात आले आहे. व त्याचप्रमाणे गळीतधान्य विकास योजनेतंर्गत -75, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत 15 असे 117 कृषी औजारे वितरण करण्यात आले असून, कांदा चाळ, शेततळ्यासाठी अस्तरीकरण (प्लास्टिक कागद) अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे पॉलिहाऊस, शेडनेट, सामूहिक शेततळे, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन योजनेतंर्गत 602 हेक्टर साठी 810 लाभार्थींना 2.30कोटी निधी वाटप करण्यात आले असल्याची माहिती यावेळी तालूकाकृषीधिकारी सोनवणे यांनी दिली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक मंडल कृषीधिकारी के. एम. जाधव, व सुञसंचालन कृषी पर्यवेक्षक एस. वाय. सावंत यांनी केले. यावेळी सदू गावीत, अनंत चौधरी, खरेदी-विक्री संघाचे सभापति गंगाधर निखाडे, गोपीनाथ पाटील, सम्राट राऊत, बाबूराव भुसार, पंडित बागूल, शिवाजी महाले, संजय उगले, भाऊसाहेब आहेर, किरण घुगे, आदी सह लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी. व्हि. पगार, ए. आर डोखळे, बी. पी. निकम, श्रीमती बोंडे, श्रीमती भंडारे, श्रीमती पी. एस. गावीत, ए. यू. अहिरे, आर. एन. बिगूल, पी. के. माळी, एस. आर. दिलाने, ठोकले, फालक आदी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Dindori taluka tops in horticulture development scheme in nashik