दीपनगर केंद्रातील चारही संच बंद!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

सरकारचा आदेश; जिल्ह्यात फारसा परिणाम नाही
जळगाव - शासनाकडून वीजनिर्मिती केंद्रातील संच बंद ठेवावेत किंवा विजेचे उत्पादन कमी करावे, असे आदेश प्राप्त झाल्याने दीपनगर येथील चारही संच बंद करण्यात आले आहेत. यातील 210 मेगावॉटचे युनिट तीन हे मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले. मुख्य म्हणजे जिल्ह्यात पाच हजार मेगावॉट विजेची मागणी असताना 1 जुलैला पाचशे मेगावॉटचे संच बंद करावे लागले होते.

पावसाळ्यात विजेच्या मागणीत तशी घट होत असते. मागणी आणि निर्मिती यात फारशी तफावत नसल्याने सध्याच्या स्थितीत भारनियमनापासून थोडा दिलासा मिळत असल्याचे चित्र राज्यभरात आहे; परंतु खासगी वीजनिर्मिती केंद्रांकडील वीज उत्पादनाचे दर आणि शासनाच्या वीजनिर्मितीच्या दरात मोठी तफावत आहे. यामुळे शासनाचे निर्मिती केंद्र संच बंद ठेवून खासगी वीज उत्पादन केंद्रांना चालना देण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे.

‘मोड‘मध्ये दीपनगरचा क्रमांक खाली
राज्यातील वीजनिर्मिती करणारे केंद्र काही कारणास्तव बंद करावयाची वेळ आल्यास कोणते संच बंद करावे; हे मिरीट ऑफ ऑर्डर (मोड) यानुसार ठरविण्यात येत असतात म्हणजेच वीजनिर्मितीसाठीचे दर ज्या केंद्राचे अधिक असतात, तो संच प्रथम बंद करण्याचा सिक्‍वेन्स लावला जातो. याचा विचार केल्यास दीपनगरचे औष्णिक विद्युत केंद्र हे आजच्या स्थितीला नवव्या क्रमांकावर असूनही येथील चारही संच बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. "झिरो शेड्यूल‘च्या विषयावर दुरुस्तीच्या नावाखाली हे संच बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे; परंतु हे कधीपर्यंत बंद ठेवावे याच्या सूचना मात्र अद्यापपर्यंत प्राप्त झाल्या नसल्याची माहिती मिळाली.

बाहेरून 2400 मेगावॉट वीज
दीपनगर येथील चारही संच ठेवण्यासोबत राज्यातील कोराडी, खापरखेडा येथील मिळून एकूण सात ते आठ संच बंद करण्याचे आदेश शासनाचे आहेत. राज्यातील विजेची मागणी अधिक आणि निर्मिती कमी अशी परिस्थिती आहे म्हणजेच राज्यातील शासनाचे वीजनिर्मिती केंद्र आणि खासगी केंद्र यातून एकूण 11 हजार 19 मेगावॉट वीजनिर्मिती केली होत आहे, तर मागणी ही 13 हजार 451 मेगावॉट इतकी आहे. याचाच अर्थ मागणी व निर्मिती यात साधारण 2400 ते 2500 मेगावॉटचा फरक आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र किंवा मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांतून वीज घेतली जात आहे.

Web Title: Dip nagara Center off four set!