Encrochment News : थेट नाल्यातील अतिक्रमणांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई; महापालिकेतर्फे मोहीम

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत शहराच्या देवपूर भागातील सुशी नाल्यातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम मंगळवारी (ता. ३०) दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.

पथकाने जेसीबीच्या साहाय्याने थेट नाल्यातील, तसेच नाल्याच्या अगदी काठावर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी अतिक्रमणे जमीनदोस्त केली. (Directly on drain encroachment Action for second day in row Campaign by Municipal Corporation Possibility of action in other areas also Dhule News)

दोन दिवसांत नेमकी किती अतिक्रमणे निघाली याची आकडेवारी मिळू शकली नाही. मात्र, थेट नाल्यात ६० ते ८० अतिक्रमणे असतील असा अंदाज मनपा नगररचना विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने व्यक्त केला.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह नाल्यातील, नाला काठावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाने यापूर्वीच नाल्यातील व नाला काठावरील अतिक्रमणधारकांना आपली अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या.

त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. शहराच्या देवपूर भागातील सुशी नाल्यातील अतिक्रमणांवर सोमवार (ता. २९)पासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Crime news : IPLची मॅच बघितली; नंतर झाडली डोक्यात गोळी

महापालिकेतर्फे सुशी नाला काठावरील सुमारे २५० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यान, दरवर्षी नाला काठावरील अतिक्रमणधारकांना अशा नोटिसा बजावल्या जातात.

मात्र मागील वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर थेट नाल्यात असलेली अतिक्रमणे निष्कासित करण्याचे काम यंदा महापालिकेने हाती घेतले आहे. सुशी नाल्यातही नाल्याच्या अगदी मधोमध, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरतील अशी अतिक्रमणे होती.

Dhule Municipal Corporation
Crime News : वहिनी, तुम्ही आवडता म्हणत केला विनयभंग

त्यामुळे या अतिक्रमणांवर जेसीबी फिरविण्यास सुरवात झाली. थेट नाल्यात अशी ६० ते ८० अतिक्रमणे असतील असा अंदाज आहे. शिवाय काही नाल्याच्या अगदी काठावर असलेली अतिक्रमणेही पथकाकडून काढण्यात येत आहेत. नेहरूनगर पुल ते प्रभातनगरदरम्यान ही कारवाई सुरू आहे.

इतर ठिकाणी लक्ष

शहराच्या विविध भागातून नाले वाहतात. या नाल्यांवर, नाल्यांच्या काठावर अनेक अतिक्रमणे आहेत. त्यामुळे सुशी नाल्याप्रमाणेच इतर ठिकाणीही कारवाई केली जाईल अशी शक्यता आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच अतिक्रमणे निष्काषित करण्याचे मनपा प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आणखी किती ठिकाणी अशी कारवाई होते याकडे लक्ष असणार आहे.

Dhule Municipal Corporation
Jalgaon Crime News : रेल्वे पोलिसांनी 29 अल्पवयीन घेतले ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com