Nandurbar News| परवानाधारकांनी शस्त्रे जमा करावी: जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar district collector Manisha Khatri

Nandurbar News| परवानाधारकांनी शस्त्रे जमा करावी: जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार: महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे.

या आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्रे ते ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात त्या पोलिस ठाण्यात जमा करावीत, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. (District collector manisha khatri order License holders should deposit arms District Magistrate Manisha KhatriNandurbar News)

हेही वाचा: Nashik News : शासकीय कार्यालयांचा मालमत्ता कर थकीत!

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक मुक्त व निःपक्ष वातावरणात पार पडावी, सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जीवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारांत भय, दहशत निर्माण होऊ नये यासाठी समितीची बैठक ९ जानेवारीला समितीचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत जे शस्त्र यापूर्वीच जमा असल्याने ते जमा करण्याबाबत आदेश पारित करण्याची आवश्यकता नाही. शस्त्र परवानाधारकांपैकी जे शस्त्र परवानाधारक जामिनावर मुक्त झालेले आहेत, जे शस्त्र परवानाधारक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत त्यांनी व निवडणुकीत उमेदवार असलेली व्यक्ती व मतदार असलेल्या व्यक्ती यांच्याकडे शस्त्र परवाना असल्यास त्यांनी आपली शस्त्रे जमा करावीत.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News: वारकऱ्यांच्या दिंड्यांनी वाहतुकीचा खोळंबा! वाहतूक पोलिसांची मिळेना मदत

न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांच्याकडे असलेले नोंदणीकृत सुरक्षारक्षक व नोंदणीकृत खासगी सुरक्षारक्षक यांना त्यांच्याकडे असलेले शस्त्र जमा करण्यास सूट देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध आपोआप रद्द होतील आणि जमा केलेली शस्त्रे परवानाधारकांना मतमोजणीच्या एक आठवड्यानंतर परत करण्यात येतील.

विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार पोलिस विभागाने कारवाई करावी, असेही जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा: Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका