Nandurbar News : फटाके विक्रेत्यांनी कायदेशीर अटी-शर्तींचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

fire crackers
fire crackersesakal
Updated on

Nandurbar News : जिल्ह्यात १० ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दीपावली सणासाठी कायद्यातील काही अटी व शर्तींनुसार तात्पुरता फटाके परवाना दिला जाणार आहे, जिल्ह्यातील सर्व फटाके विक्री, साठवणूक करणाऱ्या विक्रेत्यांनी कायदेशीर अटी-शर्तींचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.(District collector manisha khatri statement about crackers seller must follow legal terms and conditions)

या संदर्भात श्रीमती खत्री यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत या अटी व शर्ती नमूद केल्या आहेत. विस्फोटक नियम, २००८ चे नियम ८४ नुसार मुख्य विस्फोटक नियंत्रण (पश्चिम मुंबई) यांच्याकडून अटी व शर्तींचे निर्देश जिल्हा प्रशानसास प्राप्त झाले आहेत.

त्यानुसार फटाके विक्री, ठेवण्याकामी प्रत्येक बूथ व स्टॉलसाठी दिला जाणारा परवाना दारू अथवा फटाक्यांसाठी १०० किलोग्रॅम, तसेच शोभेच्या झकाकणाऱ्या फटाक्यांसाठी ५०० किलोग्रॅमपेक्षा जास्त बाळगता येणार नाही.

स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर हवे

प्रस्तावित केलेल्या आराखड्यातील शिफारस केलेले तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉल्सची संख्या एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त असल्यास दोन स्टॉलमधील अंतर तीन मीटरपेक्षा कमी नसावे, तसेच बाहेरील सुरक्षित अंतर ५० मीटर असल्यास दोन स्टॉलमधील अंतर तीन मीटरपेक्षा कमी नसावे.

fire crackers
Nandurbar News : मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

बाहेरील सुरक्षित अंतर ५० मीटरपर्यंतचे व असे स्टॉल्स दोन किंवा दोनपेक्षा अधिक रांगेत असल्यास ती समोरासमोर ५० मीटरपेक्षा कमी अंतराची नसावीत. प्रत्येक स्टॉलमधील वरील फटाक्यांची एकूण परिमाणता ५०० किलोग्रॅमपेक्षा अधिक नसावी. प्रत्येक स्टॉलचे क्षेत्र १०-२० चौरसमीटरपर्यंतचे असावे.

एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगांमधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत व ते मागील बाजूने बंद असावेत. फटका विक्री स्टॉलमध्ये अग्नी उपद्रवास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तू व बाबी प्रतिबंधित असतील.

आवाजाची मर्यादा

फटाक्यांच्या स्टॉल्सच्या परिसरात धूम्रपान प्रतिबंधित असेल. तेथे अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात असावी. अनपेक्षित घटना घडू नये म्हणून फटाका विक्री स्टॉलच्या ठिकाणी व परिसरात दक्षता पथकाची गस्ती असावी. आपटून फुटणाऱ्या फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही.

fire crackers
Nandurbar News : मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. साखळी फटाक्यांत एकूण ५० व ५० ते १०० व १०० वरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत ११५, ११० व १०५ डेसिबल एवढी असावी.

गाडीतून किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्रीस मज्जाव असेल. ज्या फटाक्यांमुळे रहिवास किंवा जवळच्या परिसरातील प्रवासी, पादचारी यांना अडथळा, गैरसोय, जोखीम, त्रास, नुकसान होण्याचा संभव निर्माण होईल असे फटाके जवळ बाळगण्यास, विक्री करण्यास, सोडणे अगर फेकण्यास मनाई आहे.

वेळेची मर्यादा बंधनकारक

रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाक्यांचा वापर करता येणार नाही. शांतता झोनमधील रुग्णालये, शौक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक, प्रार्थनास्थळे यांच्या सभोवताली १०० मीटरपर्यंतच्या क्षेत्रात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करता येणार नाही. केवळ परवानाधारकांनाच फटाके विक्री करता येईल.

परवाना मिळाल्याखेरीज कोणीही फटाके विक्री करणार नाही व मंजुरी दिलेल्या जागेवरच फटाके विक्री वैध राहील. परवान्याशिवाय फटाके विक्री व बाळगल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

fire crackers
Nandurbar Rain News: मॉन्सूनचा लहरीपणा; 9 वर्षांत चारच वेळा पावसाने ओलांडली सरासरी

परवान्यासाठी अर्ज करताना...

फटाके विक्री व साठवणूक परवान्यासाठी मागणी अर्ज विहित नमुन्यात असावा. हे अर्ज १५ ऑक्टोबरपर्यंत वितरित केले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत राहील. पोलिस प्रशासनाने प्राप्त अर्जांवर अभिप्राय कळविण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असेल.

पोलिस प्रशासनाकडील शिफारशीअंती मंजूर परवाने २५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वितरित केले जातील. फटाके विक्री परवाना विक्रीच्या ठिकाणी दर्शनी भागावर प्रदर्शित करणे अनिवार्य राहील. अर्जदारांनी त्यांचे स्वतःचे दोन पासपोर्ट साइजचे फोटो अर्जासोबत जोडावेत.

विस्फोटक नियम, २००८ आणि १८८४ तसेच शासन, प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या अटी व शर्तींचे परवानाधारकाने काटेकोर पालन करावे. वरील निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती कायदेशीर

कारवाईस पात्र ठरतील. ही अधिसूचना संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी ३१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत लागू राहील, असेही अधिसूचनेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नमूद केले आहे.

fire crackers
Nandurbar News : प्रकाशा बसस्थानकाजवळ ट्रक उलटून 7 जण गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com