जिल्ह्यात पाच केंद्रांवर "तनिष्कां'साठी मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

धुळे -  "सकाळ माध्यमसमूहा'च्या तनिष्का व्यासपीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील पाच केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. महाविद्यालयीन तरुणींपासून ते अगदी ऐंशी वर्षांच्या आजीबाईंनीही या प्रक्रियेत भाग घेतल्याने महिलांचा उत्साह दुणावला होता. दरम्यान, निवडणुकीतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने निवडून आलेल्यांचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात निजामपूर, जैताणे, चिपलीपाडा, छडवेल आणि शिरपूर या पाच केंद्रांवर आज मतदान झाले. निवडणुकीसाठी महिला उमेदवारांनी एक नेतृत्व विकासाची संधी म्हणून पाहत तनिष्का व्यासपीठाची भूमिका प्रचारादरम्यान सांगितली. महिलांच्या सक्षमीकरण व विकासासाठी निवडून द्या, असे सांगत त्यांनी वैयक्तिक भेटी आणि सोशल मीडियाचा आधार घेत प्रचार केला. प्रत्यक्ष मतदानाबरोबरच टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉलद्वारे मतदानाची संधी असल्याने त्याचा महिलांनी खुबीने वापर करून घेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुकीला सामोरे जात पुन्हा महिलांच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार सर्वच महिला उमेदवारांनी व्यक्त केला. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

यांनी लढविली निवडणूक
शिरपूर ः हर्षाली रोहित रंधे व पद्मा यतीन सूर्यवंशी. निजामपूर ः मालूबाई राजेंद्र शिरसाट व उषाबाई हरिभाऊ ठाकरे. जैताणे ः मोहिनी गणेश जाधव व छाया प्रमोद कोठावदे. छडवेल ः भाग्यश्री अजित बेडसे व संगीता गोकुळ साळुंखे. चिपलीपाडा ः लीलाबाई मोहन सूर्यवंशी व सीमा मोहन चौधरी.

Web Title: District voted for tanishka on five centers