Disabled Man Struggles for Basic Pension : कापडणे येथील दिव्यांग दीपक पाटील यांना बँक व तहसील कार्यालयात मानधनासाठी सायकलने प्रवास करत ३६ किमीची फरपट सहन करावी लागली.
कापडणे- एकीकडे दिव्यांगांचा सन्मान करा, असे आवाहन सरकार करीत असते. त्यांच्या मदतीला धावून जाणारे देखील आहेत. परंतु, बँक कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे एका दिव्यांग व्यक्तीला हेलपाटे मारण्याची नामुष्की ओढवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.